Saturday, 25 February 2017

शिवाजींचा पवाडा - लेखक (Author) जोतीराव फुले {Page -2}



--::     शिवाजींचा पवाडा    ::--


                    ॥ चाल॥
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जिजी गाऊं।
चला वेरूळास जाऊं, दौलतबादा पाहूं ॥

मूळ बाबाजीस ध्याऊं, किर्ती आनांदाने गाऊं ।
सरदारात उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥

पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊं , सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास देऊं , छंदाजोगा गिती गाऊं ॥

                     ॥ चाल ॥
मालोजी राजा । तुबा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
विचरी पक्का । जाधवा धक्का ॥
शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ॥
द्रव्याची गर्दी । चाांभारगोंदी ॥
देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्धि । गुणानें निधी ॥
लिहिलें विधी । लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
साांगोनी गेला । गादी बा तुला ॥
उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा ।
शिपाई होता बाणीचा ॥
खोठ्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपिी शिवाजीचा ॥१॥

वडील बंधू संभाजीनें लळे पुरवीले ।
धाकटयासवें खेळले ॥

उभयतांचें एकचित्त तालमींत गेले ।
फरीगदग्या शिकले ॥

आवडीनें खमकोठी कुस्ती पेंचानें खेळे ।
पवीत्रे दस्ती केले ॥

द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें ।
घोडी फिरवूं लागले ॥

आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले ।
गोळी निशाण साधले ॥

कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें ।
पुत्रा नीट एेकिवलें ॥

अल्पवयाचे असतां शिकार करू लागले ।
माते कौतुक वाटले ॥

नित्य पतीचाआठव डोंगर दुःखाचे झाले ।
घर सवतींनें घेतले ॥

छाती कोट करून सर्व होतें साटिवलें ।
 मुखमुद्रेने फसविले ॥

चतुर शिवाजीनेंआईचें दुःख ताडिले ॥
पित्यास मनीं त्यागिले ॥

पुत्राचे डोळे फिरले मा तें भय पडलें ।
होत उपदेशा योजिले ॥

मनीं पतिभक्ती पुता बागेमधीं नेलें ।
वृक्षाछायी बसीवलें॥

पूर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळीलें ।
नेत्री पाणी टपटपलें ॥

या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले ।
सांगते मुळी कसें झालें॥

क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरले ।
क्षेत्री सुखी राहिले ॥

अन्यदेशिंचे दंगेखोर हिमालयीं आले ।
होते लपून राहिले ॥

पाठी शत्रूभौती झाडी किती उपासीं मेले ।
गोमासा भाजून धाले ॥

पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले ।
झाडी उल्लंघून आले ॥

लेखणीचा धड शीपाया सेनापति केलें ।
मुख्य ब्रह्मा नेमलें॥

बेफाम क्षेत्रिय होते अचकू टोळ उतरले ।
कैदी सर्वास केलें ॥

सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले ।
डौलानें क्षुद्र म्हणाले ॥

मुख्य ब्रम्ह राजा झाला जानें कायदे केले ।
त्याचे पुढे भेद केले ॥

ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले ।
उरल्या क्षत्रिया पिडीले ॥

माहारमांग झाले किती देशोधडी केले ।
ब्राह्मण चिरंजीव झाले ॥

देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें ।
सर्वांस त्यांही पिडीलें ॥

शूद्र म्हणती तूम्हा हृदयीं बाण टोचले ।
आज बोधाया फावलें ॥

गाणें गाते ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले ।
बोलीं नाहीं मन धालें ॥

                      ॥ चाल ॥
क्षेत्र क्षत्रियांचे घर, तुझे पितृ माहावीर ।
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचें माहेर ॥

शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ॥

दरीं खोरीं वाहे नीर, खळखळे निरंतर ।
झाडा फुलें झाला भार, सुगंधी वाहे लहर ।
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥

नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार ।
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीका फार ॥

धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।
दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥

लोभी मेले येथें फार, विध्वा झाल्या घरोघर ।
उपाय नाहीं लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ॥

दसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ।
मार त्याचाअनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥

क्षत्रिय केले जरजर, भयें कांपे थरथर ।
दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥

बहु केले देशापार, बाकी राहि मांगमाहार ।
नि:क्षेत्री झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर ॥

आले सिंधुनदीवर, स्वाऱ्या केल्या वारोंवार ।
गातें कटावांतसार, लक्ष देई अर्थावार ॥

                  ॥ चाल ॥
काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥
बामना ओडी । इंद्रिये तोडी ॥
पींडीस फोडी । देऊळें पाडी ॥
चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥
गौमाांसी गोडी । डुकरां सोडी ॥
खंडयात ताडी। जेजुरी गडीं ॥
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झाडीस तोडी । लुटलीं खेडीं ॥
गडांस वेढी । लावली शीडी ॥
हिंदुस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देऊळें फोडी । बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी ॥
बुरखा सोडी । पत्नीस पीडी ॥
गायनीं गोडी । थैलीते सोडी ॥
माता मनीं ठसतां राग आला यवनाांचा ॥
बेत मग केला लढण्याचा ॥
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा ॥
स्नेह यशजी कंकाचा ॥
मित्रां आधीं ठेवी जमाव केला मावळयाचा ॥
पूर करी हत्यारांचा ॥
मोठ्या युक्तिने केला किल्ला तोरण्याचा ॥
रोवला झेंडा हिंदूचा ॥
राजगड नवा बांधला ऊंच डोंगराचा ॥
भ्याला मनीं विजापुराचा ॥
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीच ॥
दादोजी कोंडदेवाचा ॥
मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥ २ ॥

Next Page



Advertisement

The "Hidden Survival Muscle" In Your Body Missed ByModern Physicians That Keep Millions Of Men And WomenDefeated By Pain, Frustrated With Belly Fat, And StrugglingTo Feel Energized Every Day…


Wednesday, 22 February 2017

Father Of Nation: Buddha or Karl Marx - {Page - 3} Author - Dr. B. ...

Father Of Nation: Buddha or Karl Marx - {Page - 3} Author - Dr. B. ...: Buddha or Karl Marx - {Page - 3} Author - Dr. B. R. Ambedkar (Preview page) "I have said that avarice is because of posse...

Sunday, 19 February 2017

Saturday, 18 February 2017

शिवाजींचा पवाडा - लेखक (Author) जोतीराव फुले {Page - 1}



LIFE OF SHIVAJI,
IN POETICAL METRE.
BY
JOTIBA GOVINDRAO PHULE.
—०—
पवाडा
छत्रपति शिवाजी राजे भोसले
यांचा,
जोती गोपवदंराव फूले यानी
लोकहितार्थ केला;
तो
मुंबईत
“ओररएन्टल” छापखान्यांत छापिला.
सन १८६९.



--::     शिवाजीचा पवाडा    ::--

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपति शिवाजीचा ।।

लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा।
काळ तो असे यवनांचा ।।

शिवाजीचा पिता शाहजी पुत्र मालोजीचा ।
ऐसे तो डौल जहागिरीचा ।।

पंधराशे एकूणपन्नासं साल फळलें ।
जुन्नर ते उदंयाशी आलें ।।

शिवनेरी किल्लामध्ये बाळ शिवाजी जन्मलें ।
जिजीबाइस रत्न सांपडले ।।

हातापायांची नख बोट शूभ्र प्याजी रंगीले ।
ज्यानीं कमळा लाविवलें ।।

वर खालीं टिऱ्या पोटऱ्या गांठी गोळे बांधले ।
 स्कटिकापरी भासले ।।

सानू कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव शिवाजी शोभलें ।।

राजहौंसी उंच मान उनसे माघें मांदे दोंदीले ।
जसा का फणीवर डोले ।।

एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले ।
मोतीं लडीं गुतिवलें॥

रक्त नाजूक होटीं हासूं छपिवलों ।
म्हणोन बोबडें बोले ॥

सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले ।
विषावें मृग वनीं गेले ।।


नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले ।
ज्याांनी चंद्रा हाटिवलें ॥

सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें ।
कुरळे केंस मोघीले ॥

आजानबाहू पायाांपेक्षां हात लांबलेले ।
चिन्ह गादिचें दिसले ॥

जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले ।
धाकटया बाळा लेविवले ॥

किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडले ।
कलाबतुचे गोंडे शोभले ॥

लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |
डाग लाळीचे पडलेले ॥

हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे ।
पायीां घुगरूं खुळखुळे ॥

मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले ।
खेळण्यावर डोळे फिरीवले ॥

मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडलें ।
चिन्ह पाळणीं दिसलें ॥

टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले ।
पाळण्या हालवुं लागले ॥

धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले ।
गातो गीत तिनें केलें ॥

पूढील  पान - Next page -2





Wednesday, 15 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 9}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 9}

      इतकें तिचें भाषण ऐकून महाराजांनीं रागावून डोळे लाल करून म्हणावें कीं, “काय गे मूखे, शूद्रीण होऊन तूं कां आम्हांस ज्ञान सांगतेस? तुझे मनांत आम्ही आपलें कर्ज सोडून द्यावें, मागूं नये. स्वस्थपणें आम्ही आपले घरीं बसावें म्हणजे झालें!” हे त्याचे शब्द ऐकून बिचारीनें हुं चूं न करितां उगीच बसावें. त्याचिमाणे घरचे सर्व मनुष्यांनीं त्याचीं विनवणी करावी. परंतु तोतिच्याकडसे लक्ष न देतां आपण आरंभलेला दष्ट हेतु सिद्धीस न्यावा, म्हणून सर्व माल गोळा करून, जो वसूल होईल तो, रकमेतून वजा देऊन, बाकीबद्दल पुन: त्याचमाणें दुष्ट क्रम चारपांच वर्षांपर्यत चालला, म्हणजे त्या गरीब बिचाऱ्या या शेतकऱ्याची फारच दुर्दशा होऊन जात असे. त्या एका लहान अशा सात-आठ रुपयांचे रकमेकररतां त्याचें सर्व शते जाई. गुरेंढोरें जात, विहिरीमळे जात आणि सरतेशेवटीं तो हि देशोधडी जाण्यास अथवा आपले प्राणत्याग करण्यास सिद्ध होई. असो, ह्या ब्राह्मण वगैरे सावकारांनीं आपले या इंग्रज सरकारचे दयाळू राज्यांतहि त्या गरीब शूप द्रांजवळून व्याज मुद्दलासुद्धां पैसा जरी घेतला, तरी त्यांस धुळीस मिळवीत तर स्वकीय राज्यामध्यें, त्यांस जेव्हां एक वर्ष पाऊस न पडलयामुळें असा कर्ज काढण्याचा प्रसंग पडे, तेव्हां ते त्यांची काय दशा करीत असतील याची, सूज्ञ जनहो, तुम्हीच कलपना करा.
        त्या वेळेस त्या सरकारांत फर्याद वगैरे करावी लागत नसे. कारण त्यांचे घरांतच सरकार होतें. मनास वाटेल त्याप्रमाणें कुळास मारावें, झोडावें, त्याचा माल सर्व हिसकावून घेऊन जावा, त्याचीं बैलंढोरें विकांवीं, त्याचे माणसांचें हालहाल करावे, ते त्याचे प्राण जाईंतोपर्यंत पाहिजे तसें करीत. त्याचे डोक्यावर अथवा पाठीवर मोठें थोरले धोंडे देऊन त्यास भर उन्हामध्यें उभे करीत आणि खालून मिरच्यांचा धरू देत. त्याचे शरिराचे नाजूक भागास चाप लावीत व कोलदांडी घालून त्यास बेदम मार देत. सदरहूमाणेंच त्या वेळचे सरकारचे ब्राह्मण कामगार करपट्टी वसूल
करतेवेळीं त्यास नानाकारचे जाच करीत असत.
       तथापि हल्लींचे कित्येक सुधारलेले विद्वान आर्य ब्राह्मणांची, स्वकीय पेशवाई जुलुमांविषयी पक्की खात्री झाली असून, केवळ आपल्या जातबांधवांच्या भयास्तव, आर्य ब्राह्मणांचे त्रासापासून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांची मुक्तता झाली. हे स्पष्टपणें उघड म्हणण्याची त्यांची छाती होत नाहीं. सबब कशी तरी वेळ मारून नेण्याकरितां मोठ्या सार्वजनिक सभास्थानीं उभें राहून, “पूवीपेक्षां हल्लीं या तीस वर्षात शूद्र शेतकऱ्यांची स्थिती बरी आहे,” म्हणून जागोजाग व्याख्यानें देत फिरणारे व इंग्रज सरकारचे आपणांवर शतश: उपकार असून त्यांपैकीं कित्येक नावालासुद्धां न स्मरतां, राज्यास स्वाभाविक असणारे शुल्लक दोषांना सूक्ष्मदर्शक यंत्रदृष्टीनें दाखविणारे जे कोणी आहेत व कित्येक वेडगळ जुन्या समजुतीचे आर्यभट ब्राह्मण फक्त जात्याभिमान दृढ मनीं धरून, त्यांचा पक्ष उचलल्यामुळें त्यांस सदगुणांचे ओढूनताणून नकली रूप देण्यास झटणारे हललीं सांगत आहेत कीं, “पूवीं पेशवाईंत शूद्र शतेकऱ्यास जें सौख्य होतें तें सागंतां येत नाही. त्या सुखाचें हल्लीं लेश सुखदेखील नाहीं. त्या वेळची शूद्रांची राहणी काय, चालणी काय, रीतीभाती काय सर्वच चांगलें होतें. सत्य, सदगुण, सदाचार, प्रामाणिकपणा आणि धर्म हे गुण शूद्रांमध्ये अक्षय वास करीत होते. त्या वेळीं शूद्र शतेकऱ्यांजवळ पैसा तरी किती असे कीं, ‘ जिकडे पहावें तिकडे शूद्रांच्या घरांतून सोन्याचा धरू निघत असे.’ आतां तें सौख्य नाहींसें झालें. ती नीतत नाहींशी झाली, तो धर्म नाहींसा झाला आणि ती संपत्तीही नाहींशी झालीं.” या उभयतांचे बोलण्यांत किती तथ्यांश आहे, याविषयीं विचार करणें वाचकांकडे सोंपवून येथें विषय संपवितो.

जोतीराव गोविंदराव  फूले
15 जून, सन 1885  इ.
पूणे पेठ जूनागंज
घर नंबर   395

Monday, 13 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 8}





इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 8}

सृष्टिक्रमाप्रमाणे पर्जन्य कोणत्याही एका देशाचे एका भागावर पडला तर दुसरे भागावर पडत नाहीं. याप्रमाणे एका भागावर आहे तर दुसऱ्या भागावर नाही. याजमुळे शेतकरी लोकांस दहा पंधरा वर्षांआड पिकापाण्याची तूट पडते आणि अशी तूट पडली म्हणजे कित्येक शेतकरी लोकांनी आपले शेतांतील आदले वर्षीचे पीक, जें सुमारें सर्व कुटूंबातील मानसांस वर्ष  सहा महिनेपर्यंत पुरण्यासारखें असतें, तेवढें खाऊन टाकिलें म्हणजे त्यांचेजवळ दसुरे वर्षाकरितां बी भरण्यास एक पैसा देखील नसतो. अशा प्रसंगीं ब्राह्मण व मारवाडी सावकार या लोकांची जी बनून जाते, ती सांगतां पुरवत नाही. ते अशा नडींत सांपडलेलें कुणबयांस आपले परम प्रियकर मित्र समजून मोठा आनंद पावतात आणि त्यापैकीं ब्राह्मण सावकार त्यांचे घरीं जाऊन विचारतात कीं, “का पाटील, आपण चिंतेंत आहां असें दिसतें, याचें कारण काय?” “महाराज, काय सांगावे? गेले वर्षी पाऊस पडला नाहीं म्हणून त्याचे पलीकडचे सालीं जें कांहीं पीक झालें होतें, तें अद्यापपावेतों खात आलों; अललकडेस कांहीच जवळ राहिलें नाहीं आणि पेरणीची वेळ तर जवळ येऊन पोहोचली. आतां काय करावें?" असे त्यांनीं त्यांस सांगावे. तें ऐकून ब्राह्मण सावकारांनीं म्हणावें कीं, “काहीं चिंता नाहीं. आपणांस बीं भरण्याकरितां जर दहा-बारा रुपये लागत असतील तर मी देतों.” आणि अर्थात ते गरीब बिचारे शूद्र लोक, हा सावकार आपला कांहीं परिचय नसतांना ज्या अथी घरीं येऊन आपणांस दहा-बारा रुपये घ्या, असें म्हणतो आहे, त्या अथीं यानें कांहीं तरी घर घेण्याचा कपटरूप खोल विचार योजला असावा, हें पूर्ण लक्षांत न आणतां, तूर्त आपली पैशांची गरज होते, याजकडेच सर्व लक्ष देऊन आपणांस दहा-बारा रूपये देण्याविषयीं त्यांस विनंती करितात. सावकारहि ‘ठीक आहे’ असे म्हणून "उद्या येते वेळेस स्टांप घेऊन या व आपले कोणी भाऊबंद अथवा मुलेंबाळें असलयामुळें त्यांसहि बरोबर घेऊन या, बरें पाटील! म्हणजे तुमचें काम मी खास करून देतों. पाटीलबुवा, मी आपणांस कागद वगैरे आणावयास सांचगतले, त्याबद्दल मनामध्यें कांहीं एक आणूं नका. माझा तुमच्यावर पूर्ण भरंवसा आहे. मी कांहीं तशांतला नव्हे, कितीहि केलें तरी तुम्ही व आम्हीं एका गांवच. तुमचा आमचा एक धर्म असून तुमच्याबरोबर का मी, अन्याय करीन? अरे राम! असें स्वप्नांतदेखील आणावयास नको. तुमच्याविषयीं माझे मनांत तसेंच करणें असतें तर मी तुमच्या घरीं चालून येऊन ‘तुम्हांस कांहीं अडचण आहे काय, जर असेल तर मी आपणांस पैशानें मदत करतों' असे म्हटलें असतें काय? कधींहि नाहीं.” या रीतीनें वरवर गोड बोलण्याचा पाल्हाळ लावून इकडून तिकडून त्याचे जवळून कागद लिहून घेईतोंपर्यंत समजूत करावी. दसुरे दिवशीं त्यांनी स्टांप आणल्यानंतर कुलकर्णी वगैरे लोकांकडून त्यांजमध्यें नानाप्रकारच्या अटीं घालून ललहून घ्याव्या आणी त्याजवर त्यांची व त्याचे भानबंदांची किंवा मुलांची सहीसाक्ष घेऊन त्याचे हातावर लिहणावळीचा वगैरे खर्च कमी करून दहा-बारा रुपयांबद्दल नऊ -दहा रूपये ठेवावे. तो कागद लिहून त्यांस कांहीं दिवस लोटल्यानंतर त्याचें व्याजमुद्दल जरी त्यांस मिळून चकुलें, तरी त्या व्याजाचें व्याज आणि त्याचें पडव्याज जुळून त्याच्या मुलाच्या लग्नाकरितां थोडेसे नवीन पैसे देऊन, त्याजबद्दल नवीन कागद लिहून घ्यावा. पुढें कांहीं दिवसांनीं त्याचें व्याज जुळून पुन: त्याचा नवीन कागद घ्यावा. येणेंप्रमाणें क्रम चालून त्या गरीब बिचाऱ्याच्या अंगावर तीन-चार वर्षांत सुमारें दोनशें-अडीचशेंची रक्कम फुगली, म्हणजे त्याजबद्दल सरकारांत फिर्याद टाकून त्याजवर खर्चसूद्धां तीनशें अथवा सव्वा तीनशें रूपयांचा हुकमनामा करून, ऐन धान्य वगैरे काढण्याची वेळ आली कीं, त्याच्या शेतीवर जप्ती आणून बसवावी.
       हरहर! अशा प्रसंगीं जो कांहीं द: खांचा देखावा दृष्टीस पडत असतो, तो पूर्णपणें शब्दमात्रेंकरून वर्णन करण्यास अशक्य आहे. गरीब, अनाथ, दीन अशा त्या शेतकऱ्यानें आपले
मुलांबायकांसह वर्तमान वस्त्रान्नाचे मोठे हाल सोसून सर्व वर्षभर एकसारखे भर उन्हांत व पावसांत आणि थंडीत रात्रीचा दिवस करून शेतांत कष्ट केले आणि त्या कष्टाचें आतां कांहीं थोडेसें फळ घेणार, तों इतक्यामध्यें सावकाराची स्वारी बरोबर कारकून, शिपाई घेनन उभी ठाकते, तेव्हां काय विचारावयाचें! त्या शेतकऱ्यास व घरातील सर्व मुलेंमाणसांस तो सावकार–सर्वांचा प्राणहारक यमरूपी ब्रह्मराक्षस–आक्राळविक्राळ रूप धारण करून, कारकून शिपायादि आपले दतांसह आमचे प्राण घेण्यासच आला काय, असें वाटतें. मुलाबाळांचा रडण्याचा एकच कल्होळ होऊन जातो. बायका घाबरून जाऊन नेत्रांतून टपटप अश्रधारा गाळीत असतात; व तोहि आपलें कपाळ पिटून रडत असतो. त्या सर्वांवर त्या काळीं द:खाचा डोंगर कोसळून पडतो. ते दाही दिशा आठवून ईश्वराची प्रार्थना करितात कीं, " प्रभो, असा वाईट प्रसंग आमचे सप्तजन्मींचे हाडवैऱ्यासदेखील प्राप्त न होवो!” सावकरानें घरांतील धान्यें वगैरे सामान बाहेर काढलें, म्हणेज शेतकऱ्यानें पटापट त्याचे पायावर डोकें ठेवनू अनेक प्रकारें प्रार्थना करावी, परंतु व्यर्थ! स्त्रियेनें केविलवाणें तोंड करून सावकरापुढें पदर पसरून ववनंती करावी कीं, “महाराज आपलें व्याज मुद्दलासह केव्हांच फिटलें आणि पुन: आपण पुन्हा व्याजाचें व्याज करून आमच्यावर एवढी रक्कम केलीत. बरें, ती देण्यास आम्हीं कबूल आहोंत, परंतु कृपा करून तजविजीनें घ्याल, तर आमचे गरीबाचा तरणोपाय लागेल. नाहींतर आमचा सर्वस्वी उन्हाळा होऊन घरचे सर्व मनुष्यांची दशा दशा होईल आणि हीं अनाथ दोन-दोन, तीन-तीन वर्षांचीं मुलें अन्न अन्न करून प्राण सोडतील. आतां तुम्हीच पहात अहां कीं, या मुलांच्या अंगावर थंडीवारा निवारणार्थ एक हातभरदेखील फडकें नाहीं. त्याचप्रमाणें त्यांचें खाण्याचीहि मोठी दशा आहे आणि आपण हा सर्व माल घेऊन गेल्यावर या बालकांची काय दशा होईल? त्यांनीं आपलें दीनमुख कोणापुढें पसरावें? महाराज, आपले ठायीं दया, क्षमा, आणि शांती हे गुण मुर्तिमंत वास करीत आहेत. आपण दीनानाथ, दीनबंधू आहांत आणि त्याच गुणांमुळें आपणांस भूदेव म्हटलें आहे. याजकरितां या गरीब बालकांची तरी दया घेऊन त्यांचे पोटापुरतें कांहीं थोडेंसें धान्य ठेवा, अशी मी आपणांस हात जोडून, पायां पडून विनंती करीत आहे. तिचा अव्हेर करणें हे आपणांस सर्वथैव अनुचित आहे.”

Saturday, 11 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 7}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 7}

         म्हणून त्यांस पाणी जर आहे, तर सर्वच गोष्टी आहेत आणि पाणी जर त्यांस शेतकीचे कामापुरतें नाही तर ते सर्वच गोष्टीस मुकतात. कारण त्यांस एक पाणी जा अनुकूल आहे, तर जमीन कशीही खरपड, पडीक, मुरमाड असली तरी ते तिजमध्ये उत्पन्न करू शकतील. फार काय सांगावे एक पाण्याच्या साह्याने त्या तसल्या मूरमाड जमिनीवर जीं जीं धान्येतो हंगाम नसताना उत्पन्न करतां येतील. त्याचें लहानसे उदाहरण पहा कीं, 'आऊंदा' जवळ ज्या जमिनीवर हल्ली आपलेम गव्हर्नसाहेबांचा बंगला आहे, ती जमीन आपणास थोडक्याच दिवसांपूर्वी अतिशय मुरमाड असल्यामुळे कोणत्याहि प्रकारचे पीक येण्यास अगदी नालायक असें वाटत होतें. परंतू तिच्यावरच हल्ली फळवृक्ष, पुष्पवृक्ष आणि दुसरे नानाप्रकार वृक्ष व वनस्पती यांच्या योगाने एक सुदंर मनोहर बाग होऊन गेला आहे. त्यासारखा बाग चांगले मशागत केलेले काळेभोर जमिनीवर देखील पुणे मुक्कामी सांपडणे विरळा.
          अशा वाईट जमिनीवर आस उत्तम बाग होणे हे मोठे आश्चर्य होय.परंतू थोडासा विचार करून पाहिलें असता त्याचे मुख्य कारण त्या जमिनीवर नदीपासून पाण्याचा नळ आणून जिकडे तिकडे पाणीच पाणी सोडले आहे.याशिवाय मनुष्याचे श्रम वगैरे ही कारणे आहेत खरी; परंतु ती मुख्य आहेत असे म्हणता येत नाहीं . त्यांत पाणीच मुख्य कारण असे समजले पाहिजे. याजकरिता शेतकरी लोकांस शेतकीच्या कामास पाणी असणें ही मूख्य गोष्ट आहे.
        ते असें समजतात की, त्यांस पाणी जर आहे, जर तेच त्यांचे सर्व धन व एश्वर्य आहे. त्याचमध्येच त्यांच्या सर्व सोयी व ऐषआरामाच्या गोष्टीं आहेत. कारण त्यांस जर एकाच साली पाण्यानें आपलें हातचें सोडिलें कीं त्यांचे सर्व सौख्य जाते, संपत्ती जाते, आणि मुलांबाळासह व दुसरी कुटुंबांतील माणसें त्यासह मोठे विपत्तीत पडतात. कित्येकांना आपला देशत्याग करावा लागतो. कित्येक अन्नाकरितांत्राही त्राही होऊनलोकांच्या घरोघर, दारोदार ( भीक मागू ) लागतात. कित्येक आपले प्राणत्यागासही प्रवृत्त होतात. आतां या गोष्टी कोणते रीतीनेंघडून आल्या व हल्ली येत आहेत याविषयी लिहिणें अवश्य वाटल्यावरून थोडेसें लिहितों.



Friday, 10 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 6}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 6}

        स्वम्मातदेखिल आणावयास नको. दररोज जंधळ्याच्या, नाचख्याच्या अथवा बाजरीच्या भाकरी नुसते मिठाचे खडयाबरोबर, मिरचिबरोबर किंवा कांद्याबररोबर खाव्या लागत. वेळेस भाजीस तेल मिळाले तर मीठ मिळु नये, मीठ मिळालें तर मिरची मिलूं नये. कधी जोंधळयाच्या किंवा नाचण्याच्या कण्या भरडून त्याचा घाटा करून गिळावा. कधी नूसती भाजीच उकडून खावी त्यावर आपला गुजारा करावा आणि कधी कधी तर फक्त पाणी पिऊन व  पोट दोरीने आवळून शेतांत खपावें लागत असे.
      अशा प्रकारें दारिद्रयाने ग्रस्त प्रजेचा पैसा (अतिशय कष्टांनी मिळविलेला पैसा कररूपाने हरण करून) तची व्यवस्था वर सांगितल्या प्रमाणे आपले जातीचे आर्य लोकांस जेवण घालज्याकडेस करावी, म्हणजे मोठी निंद्य आणि कुनीतीची गोष्ट आहे. त्याच पैशाचा निदान थोडासा अंश तरी असे कालवे बांधण्याकडेस अथवा तशाच प्रकारची दुसरी सत्कृत्य करण्याकडेस उपयोग केला असता आणि बाकीचा सर्व पैसा आळसास उत्तेजन देण्यामध्ये खर्च केला असता, तरी त्यापासून प्रजेसबरेंच कल्याण होऊन ती अन्नवस्त्रास मोताद झाली नसती व .भटराजाचे कीर्तिलाहि कलंकल लागला नसता. त्यांनी शेतकरी लोकांचे शेतांस अशा रीतीने, म्हणजे कालवे वगैरे बांधून पाणी पुरविलें असतें, तर शेतामध्यें विपुल धान्ये  वगैरे वेळचे वेळेस पिकून शेतकरी लोकांस सहज रीतीनें पाहिल्यापेक्षा दुप्पट, चौपट कर देण्याचें सामर्थ्य आलें असते आ आणि तेणेकरून भटराजे व ब्राम्हण लोकहि येथेच्छ लाडूचे भोजन जेवून उठल्यानंतर त्यांस रगड दक्षणा देण्यास समर्थ झाले असते. अथवा ब्राम्हणाने ओकारीखे येईतोपर्यत जेवण झाल्यानंतर, जे कोणी तितके लाडू खातील, त्या प्रत्येकास प्रत्येक लाडूमागें जेथे दहा दहा रुपये लावावयाला सांपडत, तेथे वीसवीस किंवा तीसतीस देखील रूपये देण्यात सांपडले असते; परंतू हा विचार त्यांस तूर्त स्वहीतबुध्दीमुळे सुचला नाही.
      त्या वेळेस कनालवगैरे नसल्यामूळे शेतकरी लोकांची मोठीच दुर्दशा होऊन जात असे. जिचा परिणाम अद्यापपावेतों त्या लोकांपैकी शेकडों गरीब लोकांस सोसावा लागत आहे. हल्लीं ज्या ज्या देशास शेतकीचा कामाला पाणी देण्याकरीता असे कनाल नाहींत, त्या देशांतील शेतकीचें काम करण्यास मोठी गैरसोय असे म्हटलें पाहिजे, व त्यांस आपले ( शेतकीच्या कामावर अवलंबून, आपलेदारे दरिद्रयावस्थेत) देशांत कनाल होईतोंपर्यंत मूक्त होण्यास दुसरा मार्गहि नाहीं. बहुतेक लोकांस ठाऊक आहे कीं, नवीन सरकारचे देशांत शेतकीचें काम बहुतकरून कनालवरच चाललेले आहे. आणि त्यांजमूळे तेथील शेतकरी लोकांचीहि स्थिती फारच उत्तम आहे. त्याचप्रमाणे या देशांत निझाम सरकारचे राज्यात जेथें जेथें कनाल आहेत, तेथे तेथे कुणबी लोक चांगले खाऊनपिऊन सधन आहेत. शेतास अशा स्वल्प रीतीनें वेळेवर पाहिजे तितके पाणी देण्याची सोय नसल्यामुळे या देशाचे भागांतील कुणबी वगैरे शेतकीचे काम करणारे लोकांवर पूर्वी मोठे वाईट प्रसंग पडत असत. शेतकरी लोकांचे काम पाण्यावर फारच अवलंबून असते.

Thursday, 9 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -5}




इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -5}

आतां त्यांचे स्त्रियांचे पोशाखाविषयी विचाराल, तर तो सांगण्यास आम्हास मोठें दुःख वाटतें. त्या बिचाऱ्या त्यावर काय समजून आपले दिवस काढीत असतील ते असोत, परंतु यांच्याकडुन त्यांस तिळमात्र देखील सुख मिळत नसे. बिचाऱ्यांसएखादा जाडा सुमारे दोन किंवा अडीच रूपये किमतीचा मिळाला, तर त्यांस एक दोन वर्षांपर्यंत घालवावा लागे. त्यास सोडवणीला दुसरें एखादे लुगडें किंवा वस्त्रदेखील नसे, आणि पाठीमागे कामाचा रगाडा असल्यामुळे तेंच लुगडें त्यास चार चार, पाच पाच दिवस न धुतां तसेंच नसावे लागे.एखादे वेळेस कामांतून सवड सांपडली, तर नदीवर जाऊन नेसलेल्या लुगडयाचा अर्धा भाग मोठ्या लज्जेने दुःखित होतांना अंगावरचा काढून तो प्रथमतः धूवावा. त्याप्रमाणे तें लुगडेंजीर्ण होऊन फाटत चालल्यामूळे प्रथम अंगावरील अध्र्या भागास शिवावे व तो नेसल्यानंतर दुसरे नेसलेले अध्र्या भागास शिवावे. पुढे ते लुंगडे फाटून फाटून त्याचा सात किंवा आठ हात लांबीचा धडपा राहून त्यास इतकीं ठिगळे असावयाची की, मुळचे हे कोणत्या रंगाचे लुगडे होते हे सांगता येत नसे. अशा प्रकारच्या अंगास अपुरत्यालुगडयाचा धडपा मोठे कष्टांनी नेसून डोळ्यावर गोवऱ्यांची पाटी घेऊन भर बाजारांत जावे. हरहर! कितीही दु:खाची गोष्ट आहे बरे!
      ही सांगते वेकेस शूद्र लोकांचे अंतःकरणाचे शतशःतूकडे तूकडे होत असतील यांत कांही संशय नाही. त्यांस असे वाटत असेल कीं, आम्ही या जन्मांत व्यर्थ आलों. बेहत्तर, आम्ही जन्यतांच मेलों असतो, तर फार बरे होतें. परंतू आपाले समक्ष आपले स्त्रियांची अशी दशा पाहणे नको. एक वेळ मनुष्य आपणास कसेहि संकट असो. शरिरास मोठे क्लेश होत असोत, तथापि ते सर्व सहन करु शकेल; परंतू आपले प्रिय जनांचे हाल होत आहेत, हेकधाहि। तो सहन करू शकणार नाही. ते पाहताक्षणीच तो केवळ मृतप्राय होतो. असे जरी त्यांस वाटत असेल तरी ते गरीब लोक करतात काय? निरूपायाची गोष्ट पडली. बरें, त्यांस खाण्यास तरी चागले असते काय?
(Next page coming soon)

संत सेवाभाया वत्यांची तांडा- संस्कृती गोर पनी बंजारा



संत सेवाभाया वत्यांची तांडा- संस्कृती गोर पनी बंजारा
         १५फेब्रुवारी १७३९हा दीवस सेवाभायाचा जन्म दीन गोलार डोडी तांडा (आंध्र प्रदेश) येथे रामावत भुकीया या कुळात जन्म झाला. बंजारा जातीचा मुख्य व्यवसाय म्हणजे बैलांच्या पाठीवर वोझे (माल)लादुन भारतभर व परदेशात व्यापर करने याला बंजारा बोलीत 'लदेनी (ओझे लादने) असे म्हनतात. गाय बैलाचे तांडेचे-तांडे बाळगून गोर-बंजारा भटकंती करायचा.म्हणूनच बंजारा वस्तीला तांडा असे नाव पडले.गोर-बंजारा लोकाची ही तांडा संस्कृती म्हनजे गणव्यवस्था संस्कृती अर्थातच मुळची सिंधू सभ्यता होय.अत्यंत विकसीत अशा सिंधू सभ्यतेवर परकीय आर्यांनी आक्रमण करून विध्वंस केल्याचा उल्लेख बंजारा लोकगीतांमध्ये आढळून येतो.संत सेवभाया यांना आपला ईतिहास माहीत होता आनी म्हणून त्यानी जे कार्य हाती घतले ते कार्य म्हणजे आपली समता,स्वातंञ्य,बंधुता वन्यायावर आधारीत गण व्यवस्था टीकुन ठेवने.जी विदेशी ब्राम्हणांच्या वर्ण व्यवस्थेविरूध्द होती.बंजारा समाज आजही आपली वोळख -भाषा (गोर बोली)विशीष्ट पेहराव (स्ञियांचा)सन,वार,लोकगीते,सत्यधर्म इ.च्या माध्यमातून जपून ठेवली आहे.ती ओळख म्हनजेच.संत सेवाभाया यांच्या कार्याचे फलीत होय.गोर बंजारा व्यक्ती भारतच्या कोनत्याही राज्यात गेली तरी थेट गोर बोलीत संवाद साधू शकते.तसेच इतर जातीच्या वस्तीपासून दुर तांडा -नामक स्वातंञ वस्ती करून राहने ही ऐक स्वातंञ वोळख निर्माण करून आपला ऐतिहासीक वारसा जपन्याचा प्रयत्न असावा तसेच इतर समाजाने पुष्यमिञ शुंगाच्याप्रतिक्रान्तीनंतर जेव्हॉ वर्ण व्यवस्थेचे रूपांतर जाती व्यवस्थेत करन्यात आले. त्यानि ब्राम्हनाची गुलामी मान्य केली.व त्याना गावात स्थान मीळाले. बंजारा समाजाने आपली वेशभूशा,व बोलीभाषाच्या माध्यमातून सिंधू सभ्यतेची ओळख जशिच्या तसी टीकून ठेवली व आपले ब्राम्हणीकरन होवू दीले नाही़ अशा प्रकाराचा इतिहास संत सेवालाल महाराजाला माहीत होता.व गोर बंजारा गनाचेकोनत्याही प्रकारे ब्राम्हणीकरन होवू दीले नाही.त्याच्यादीलेल्या शिकनीवरून सिध्द होते.:-संत सेवाभायाचे कार्य व शिकवन :- सेवाभायाचे प्रबोधनाचे माध्यम हे "थाळी-नंगारा"होते त्याच्या माध्यमातून आपले प्रबोधनातून विचार माडत.त्याला गोर बोलीत सीकवाडी म्हनतात.त्याला व त्याचे गोर बोलीत जे वचने प्रसीध्द आहेत त्याला 'भायार बोल' असे म्हनतात . संत सेवाभाया म्हनायचे थाळी नंगारारे घोरेम सदा-सदा रो म्हनजे प्रबोधनाच्या माध्यमातुन सदा जागृती करा़.
(बंजारा सामाजीक कार्यकरर्ता साहेबराव राठोड औराळा (तांडा) )

Wednesday, 8 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -4}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -4}

शंकडों वर्षे भट राजांनी प्रजेवर वाकेतोंपर्यंत कराचे ओझे लादून कोटयावधि रूपये घशांत हा टाकिले, परंतु त्याचा एक छदाम तरी ईश्वराला स्मरून तिच्या कल्याणाकडे लावायचा होता! हरहर!प्रजेपासून वसूल केलेल्या पैशांचा ज्या रीतीने त्यांनी व्यय केला ती सांगण्यास आम्हांस लज्जा वाटते. त्यांनी आपले जातीचे भट लोकांकरिता जागोजागी देवाची संस्थानें स्थापन करून तेथे त्याजकारिता अन्नछत्रे घातली, प्रजेकडून पैसा वसूल झाला की, लागलीच ब्राम्हण भोजनप्रीत्यर्थ अमुक संस्थानाकडेस दोनळक्ष रूपये, अमुक संस्थानाकडेस पन्नास हजार, येठोप्रमाणे ठराव करून पैसा वाटून घ्यावा. आणि दररोज पर्वतीसारख्या संस्थानावर आज काय, फक्त ब्राम्हणांन तूपपोळीचें जेवण व वर दहादहा रुपये दक्षणा, आज काय ब्राम्हणांस लाडूचें जेवण व वर वीसवीस रूपये दक्षणा, आज ब्राम्हणांस केशरभाताचें जेवन व वर ओगराळें भरून रूपये प्रत्यकास दक्षणा, याशिवाय कित्येक ब्राम्हणांस शालजोडया, कित्येकांस पागोटीं, कित्येकांस पागोटीं, कित्येकांस धोतरजोडे, कित्येकांस यथासांग वर्षासन देण्याच्या नेमणुका, अशा रीतोनें दररोज ब्राम्हणांस यथेच्छ भोजन घालून वर रगड दाक्षिणा देण्यात व बक्षिसे देण्यात प्रजेस अति दुःख होऊन वसूल केलेल्या सर्व पैशांची नासाडी करून टाकली होती.
      बरें, त्या वेळेस प्रजेची तरी खाऊन पिऊन सरकारी कर देण्याजोगी स्थिति होती काय ? मुळींच बोलावयास नको. तिची जी कांही दशा होती, ती सांगतां पुरवत नाहीं गरीब बिचारे शूद्र लोकांस रात्रंदिवसभर उन्हाळ्यात, पावसाळ्यांत आणि हिंवाळ्यात एकसारखे शेतांत कष्ट करावे लागत असे. त्यांचे अंगास जाडेभरडे वस्त्र किंवा पोटास जाडेभरडे अन्न देखील मिळण्याची मोठीमारामार पडत असे. डोक्सास पहावें तर फाटकी जीर्ण अशी वीस किंवा पंचवीस हात लांबीची चिंधी, जिला पामोटे म्हणण्यास मोठी लाज वाटते. अंगावर सर्व उन्हाळा- पावसाळाभर फाटलेली एखादी खरबरीत घोंगडी, पायांत पांचसात ठिकाणीं सांधलेला,वरून दोरीचे तुकडयाने बांधलेला फाटका जोडा, तोहि अगदीं जेव्हां भर उन्हाळा असेल तेव्हां मात्र घालावयाचा आणि तो संपला म्हणजे दुसरे वर्षाचे उन्हाळ्यास तसाच जनत करून ठेवावे. बाकी सर्व वर्षभर पायास जोडा म्हणून मुळीच माहीत नाहीं, फार काय सांगावें, नेसण्या कारता हात - सव्वाहात लांबीचे फुडकेंदेखील मिळव्याची भ्रांत. बाजारांतून एखादी दमडी टोलीची वस्तू आणणे झाल्यास ती आणण्याकरिता त्याचेच एक बाजूस अथवा पागोटयांत बांधावी, परंतू ती आणण्यासाठी दुसरें वस्त्रदेखील मिळू नये. ही त्यांचे खुद्द पोशाखाची संक्षिप्त हकीकत झाली. (Next page Coming Soon)

Tuesday, 7 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -3}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -3}

अशा प्रकारें मदांध होऊन प्रजेशीं क्रुर रीतीने वागणारे जे राजेलोक व त्यांचे जातीचे लोक यांची सत्ता सर्वशाक्तिमान जो परमेश्वर याने हरण
करुण त्यांस त्यांचे अपराधानूरूप शासन दिलें आणि कनवाळू होऊन आपले दुःखांनी पीडीत अशा शुद्रादी आतिशूद्र प्रजेसपरमन्यायी, हितावह , सौख्यकारक, सदाचारी आणि शांत असे राज्य इंग्रज सरकारच्या अंमलाखालीं प्राप्त करून दिले. सबब ती त्या प्रभूची फार फार ऋणी आहे व त्यास रात्रंदिवस अशी प्रार्थना करीत आहे कीं," हे प्रभो, आम्हांस हे राज्य चिरकाल असूं दे." कारण हे राज्य झाल्यामूळ प्रजेस पूर्वीच्या राज्यांत ( भटशाहीमध्ये ) जे कांहीं द्वेषामूळे, धर्मसंबंधाने, राज्य संबंधाने आणि दूसऱ्या अनेक गोष्टींच्या संबंधाने जुलूम होत असत, त्या सर्वांतून ती एकदाची सुटली
        हल्ली कोणत्याहि प्रकारे दुसऱ्याचे अनहित न होतां ज्या हितावह गोष्टी आहेत, त्या तिचे मनोदयानूरूप करण्यास तिजला उत्तेजन प्राप्त झाले आहे. .पूर्वी प्रजेने मिळविलेली मालमत्ता केवळ लुटारू लोकांपासून असुरक्षित होती.एवढेच नव्हे, परंतू लिजला मोठमोठया आधिकारी व राजे लोकांच्या पेंढारी लोकांपासूनहि अक्षय भीति असे आणि अर्थात लोकांस स्वकष्टातजित पैशाचा उपभोग घेण्यास किंवा त्याचा संचय करून ठेवण्यास अनेक अडचणी असल्यामूळे दिवसानूदिवस त्यांची उमेद खचत जाऊन ते आळशी, निरोद्योगी, दारिद्रयाने त्रस्त होत चालले होते तसेच हल्ली स्वमेहनतीनं संपादन केलेल्या पैशांस अगदी धोका नाही, म्हणून लोकांस आपले पैशाचा यथेच्छ रीतीने उपभोग घेतां येतो, त्याचा संचय करता येतो, त्याची मनास वाटेल त्याचप्रमाणे व्यवस्था करतां येते. सारांश, त्याजवर त्यांची सर्वस्वी मालकी असते.
     या कारणामुळेंत्यांनी आपला सर्व आळस टाकून पहावे तिकडे सरकारनें प्रजेच्या कल्याणाकरिता अनंत खटपटी करून अनेक सूधारणा केल्या आहेत आणि दररोज तिचे सुखाकरितां नानाप्रकारच्या गोष्टींची योजना चालविली.  आहे. पूर्वी प्रवास करणे म्हणजे लोकांसमोठे संकट वाटत असे; कारण त्या वेळेस प्रवासाचे कामांत अनेक अडचणी असत. हल्लीं सरकारने सडका वगैर नीट बांधून नीट बंदोबस्त केल्यामुळे त्या दूर झाल्या आणि लोकांस प्रवास करण्याविषयीं आनंद वाटूं लागला. त्याचप्रमाणे सरकारने प्रजेचे कल्याणाकरितां पूल बांधले. मोठमोठाली विद्यालये स्थापन केलीं, दवाखाने बांधिले. सर्व जातींचे गरीबगुरीब लोकांसाठी धर्मशाळा बांधिल्या, वगैरे शेकडों कृत्यें केली; परंतु त्या सर्वांमध्ये हल्ली जे कांही कृत्य प्रजेळारेतां सरकारनें हल्ली जे कांही कृत्य प्रजेकरितां सरकारनें हातांत घेतले आहे, तें फारच उत्तम असून मोठे स्तुत्य व सरकारास चिरकाल भूषणासद आहे. त्या कृत्यांचे महत्व फार काय विशेष सांगावें, परंतु ते कृत्य सरकारनें आरंभिल्यामूळे आज फार दिवसांपासून दारिद्रयाने गांजलेल्या प्रजेला उर्जितकाळच प्राप्त झाला आहे. तें कोणतें म्हणाल, तर जागोजाग डोंगराच्या आसपास खिंडी बुजवुन मोठमोठाले विस्तीर्ण पाण्याचे तलाव केले आहेत.
    त्या स्थळांपासून अनेक सुंदर कनाल काढून सरकार जागोजागी त्याचे पाणी सर्व आसपासचे गरीबगुरीब शेतकरी लोकांस अक्षय शेतकींचे कांम चालावें बज्या ठिकाणी मनुष्यास पाणी पिण्यास देखील मिळण्याची पंचाईत, ती दूर व्हावी, अशा कृत्याची फार दिवसांपासून गरज होती, ती ईश्वरकृपेने लवकरच घडून आली. (Next page coming soon)

Monday, 6 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -2}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -2}

त्यांनी आपले अविचाराचे हेतू सिद्धीस जावे, म्हणून हातांमध्ये अंमलरूपी अति तीव्र कोरडा घेऊन या देशांतील हस्तगत झालेले दीन प्रजेचे अंगावर. फडाफड उडवीत गेले. त्या वेळेस ते प्रजेस, ज्या हितकारक व सौख्यकारक गोष्टी त्याजमध्ये सुधारणा न करिता, तिचा कसा छळ. करावा, त्याजमध्ये मोठे प्रवीण होते. इतिहासावरून पाहिले असता असे समजते की, कित्येकांनी एखाद्या मिथ्या व क्षुल्लक कारणांकरिता प्रजेपैकी शेकडो मनूष्यांस त्रस्त करून शेवटी त्यास मोठे दूष्ट रीतीने जिवामिशी मारावे, कित्येकांनी आपल्या दुष्ट वासना तृप्त करण्याकरिता कुलीन, पतिवृता आणि संदर अशा दुसऱ्याच्या स्त्रियांचा जुलूमाने अभिलाष धरावा आणि लहानसहान अपराधाकरिता मनुष्याचे हालहाल करून त्यास देहान्त शिक्षा द्यावी. या वेळेस मनूष्यास शिक्षा देण्याचाही मार्ग मोठा विलक्षण व भयंकर होता. याजविषयीं केवळ ऐकिले असता हल्लीच्या कालांतला कसाहि मनुष्य असला, तथापि त्याचे अंतःकरण कळवळून येऊन भयाने सर्वांगास काटा आल्याशिवाय राहणार नाही. पहा,सुळावर देणे हे किती घोर कृत्य आहे! त्याचे सुर्कसारखे अणकुचीदार अग्रावर मनुष्यास बसवून ते अग्रया मनुष्याचे मस्तक फोडून बाहेर निघेपर्यंत त्यास खाली ओढणे म्हणजे निदर्यतेची पराकाष्टा झाली. तसेच मनूष्यांचे अंग चाबूकाने अथवा झाडाचे फोकानें फोडून सर्वांगातून रक्त वाहावे तोपर्यंत मारून, त्याजवर मिठाचे अथवा चिंचेचे पाणीवरून शिंपडावे आणि त्यापासून त्यास अत्यंत व्यथा प्राप्त होऊन तो तरफडून कसा तळमळत आहे हे पहावें, अथवा त्याची मोट बांधून कडेलोट करणे, अथवा हत्तीस मस्त करून त्याचे पायास मनूष्यास बांधून या हत्तीस खडकाळ रस्तावरून फिरवणे ( प्रख्यात व पराक्रमी विठोजीराव होळकसारख्या वीराची निमकहराम पेशव्यांनी कशी दुर्दशा केली याची आठवण करा.) अथवा मनूष्याचे तोंडात तेल, शेंदूर अथवा शिसे पागळवून ओतणे वगैरे शिक्षा केवळ द्वेषामूळे अथवा यतकिंचित अपराधांमूळे प्रजेस सोसाव्या लागत. थोडकेच दिवसामागे म्हणजे आर्य पेशवे यांचे शेवटील कुलदीपक पुरुष रावबाजीचे कारकिर्दीचा अस्त होईतोपर्यंत, शेतकरी लोक शेतसारा देण्यास थोडेसे चुकले, तर त्यांस उन्हामध्ये ओणवेकरून पाठीवर एक मोठा दगडद्यावा, अथवा त्या शेतकऱ्याच्या बायकोस व्याच्या पाठीवर बसवावे आणि खालून त्यांस मिरच्यांचा धूर द्यावा. तात्पर्य, त्या वेळेस प्रजेस दुःख देण्याच्या कामांत जी कांही सूधारणूक झाली होती, ती अन्य देशांतील प्रजेच्या दू:खाशी तूळ ना करून पाहिली असता, हटकून पाहिले बक्षिस हिजला मिळायचेंच! व हयांचे जातीचे लोक प्रजेस कोणते रीतींने छळावेलिजला कोणते रीतीनें आधिक दुःख प्राप्त होईल, कोणता उपाय योजला असता तिचे अकल्याण होईल वगैरे शास्त्रांचा रात्रंदिवस एक भावानें, एक निश्चयाने जसे काय अभ्यासच करीत होते की काय, असे वाटते, प्रजेस दुःख देणे म्हणजे तिला मारणे, तोडणे, लुटणे किंवा त्रस्त करणे असा अर्थ समजत असत. प्रजेच्या अकल्याणात त्यांस मोठा संतोष वाटावा. ते प्रजा याचा अर्थ काडी, कस्पट, ढेकूण अथवा कांही एक प्रकारची जनावरे समजत. त्यांचा उपयोग म्हटला म्हणजे त्यांनी राजे व त्यांचे जातीचे लोकांकरिता, त्यांचे स्त्रियांकरितांव मुलाबाळांकरितां धान्य उत्पन्न करावे व वस्त्रे विणावीं, त्यांच्याकरिता उन्हातान्हांत खपावे आणि त्यांस ज्या ऐषआरामाच्या गोष्टी लागतात, त्या सर्व पूरवाव्यात, हयाशिवाय दूसरा कांही नाही, असो. (Next page coming soon)

Sunday, 5 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -1}


इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -1}

" जिस तन लागे वहिं  तन जाने /
बीजा क्या जाने गव्हारा रे // "

या भारत देशाच्या स्थितीविषयी साधारणपने थोडासा विचार करू गेल्यास आपले सहज असे लक्षात येईल की, या देशावर प्राचीन काळापासून ज्या ज्या लोकांनी स्वाऱ्या केल्या, त्यांपैकी बहूतेकांचे हातून या देशांतील मूळचे राहणारे शुद्रातिशूद्र प्रजेस सौख्यकारक व दिवसानू दिवस तिचे सुधारणुकीस कारणीभूत असून, देशाचे ऐश्वर्यवर्धक अशा क्वचितच गोष्टी घडून आल्या. प्रथमतः इराणी लोक म्हणजे जे हल्ली सर्व भारतभर ' आर्य ' अथवा 'ब्राम्हण ' या नांवाने प्रसिध्द आहेत , त्या लोकांनी या देशावर स्वाऱ्या करून आपली सत्ता स्थापन केली. या विषयी प्ररशूरामाचे कारकीर्दीचे उदाहरण बस आहे. पुढे त्यांनी मन मानेल तसे सर्वथैव स्वहितास उद्देशून मनुसंहितेसारखे कायदे करून, त्यांस विशेष वजनदारी आणण्याकरिता धर्माचे पूट देऊन, त्या वेळचे अज्ञानाध:काराच्या महार्णवांत गटांगळ्या खाणाऱ्या शुद्रादि अतिशूद्र जनांत प्रसार करण्यामध्ये ज्य मिळविला. पुढे कांही काळानंतर मूसलमान लोकांनी ( अफगाण , मोगल वगैरे ) या देशावर स्वाऱ्या केल्या. त्याचप्रमाणे अलिकडे यूरोपातील डच, पोुर्तगीज, फ्रेंच इत्यादि लोकांनी स्वाऱ्या केल्या ;परंतू त्या स्वाऱ्या कांही विशेष म्हणण्यासारख्या ननव्हेत; कारण त्या लोकांची सत्ता या देशांत फारच थोडे ठिकाणी असून अल्पकाळचातच नाहींशी झाली. त्यापासून प्रजेस विशेष सूख प्राप्त झाले नाही व विशेष दुःख हि प्राप्त झाले नाही. वर जे लोक सांगितले, त्यांपैकी पहिले दोन म्हणजे आर्यब्राम्हणव मुसलमान यापासून प्रजेस (येथे व पुढे प्रजा शब्दाचा अर्थ शुद्रादि अतिशूद्र लोक समजावा.) फारच त्रास उत्पन्न झाला. ते स्वतः कपट, मत्सर, क्रूरता, आपलपोटेपणा वगैरे अवगुणांचे केवळ मार्तिमंत पुतळेच होते, यांत काही संशय नाही. 

Saturday, 4 February 2017

Satyashodhak Muknayak: "आरक्षण " आर्थिक निकषावर की ?

Satyashodhak Muknayak: "आरक्षण " आर्थिक निकषावर की ?: "आरक्षण " आर्थिक  निकषावर आधारित पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांच्या साठी काही महत्त्वाचे प्रश्न.   (1)छ.शिवाजी महाराजांचा राज्...

"आरक्षण " आर्थिक निकषावर की ?

"आरक्षण " आर्थिक  निकषावर आधारित पाहिजे असे ज्यांना वाटते त्यांच्या साठी काही महत्त्वाचे प्रश्न.  
(1)छ.शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ब्राह्मणांनी नाकारून त्यांचा अपमान केला, तो कोणत्या आधारावर केला ? जातीच्या की आर्थिक निकषावर?    
(2) बाजीराव पेशव्यांच्या सत्ता काळात मांग, महार, डोहोर, चांभार यातून कोणी ही तालीम खान्या पुढून गेला असता गुलटेकडीच्या मैदानावर त्याच्या शिरा चा चेंडू आणि पेशव्यांच्या तलवारी चा दांडू करुन पेशवे खेळत होते.  जातीच्या की आर्थिक निकषावर? 
(3) शिदनाक महार ह्या शुर सैनिकांचा  
रणांगणावरील राहुटी चा तंबू ब्राह्मण सैनिकाने आपल्या शेजारी ऊभारण्यास नाकारला, कारण विचारले असता त्यांनी सांगितले की याच्या तंबू कडून वाहणाऱ्या हवे मूळे   माझा तंबू विटाळेल मला बाट होइल.  येथे आधार कोणता?   जातीचा की आर्थिक ? 
(4) राष्ट्रपिता  महात्मा जोतिराव फुले   यांना ब्राह्मण मित्र परांजपे यांच्या  लग्न वरातीतून अपमान करून हाकलून दिले, जातीच्या की आर्थिक निकषावर? 
(5) राजश्री छ.शाहु महाराज पंचगंगा नदीत अंघोळ करीत असताना त्यांचा राजपुरोहीत नारायण भटांनी वेदोक्त मंत्र म्हणण्याचे  नाकारले. त्याने पुराणोक्त मंत्र म्हणने सुरू केले. शाहू महाराज यांनी विचारल्यावर त्याने उत्तर दिले. वेदोक्त मंत्र हे शुद्रासाठी नसतात. नारायण भटाने यथे कोणता  निकष लावला जातीचा की आर्थिक?  नारायण भट  तर त्यांचा नौकर होता. त्यांच्या पैस्यावर जगत होता.
(6) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणी शाळेत बसण्याची मनाई होती. शाळेतील मठातील पाणी  सुध्दा पिता येत नव्हते. जातीच्या की आर्थिक निकषावर? 
(7) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी चवदार तळ्यावर सत्याग्रह करावा लागला? जातीच्या मान,सन्मान,स्वाभिमाना साठी, आम्ही पण माणूस आहोत. नैसर्गिक देनगी असलेल्या पाण्यावर आमचा सुध्दा उच्च वर्णीया येवढाच हक्क अधिकार आहे. हे सांगण्यासाठी  
की आर्थिक फायदा होईल या साठी? चवदार तळ्याचे पाणी अतिशुद्राना  पीण्यासाठी ब्राह्मणांनी मनाई केली
कोणत्या आधारावर जातीच्या की आर्थिक? 
(8) त्या काळात मांग, महार, डोहोर, चांभार ई . जातींना मंदिरात प्रवेश नव्हता. सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिल्या जात नसे. सरकारी रुग्णालयात उपचार घऊ देत  नसत .नवीन कपड्यांवर चिखल टाकून देत असत.व्यवस्थित खावू सुध्दा देत नसत.ऊष्ट खरकट खावून  जगाव लागत होत. हे सर्व प्रकार जातीचा आधार घेऊन केले  जात होते.की आर्थिक निकषावर? 
(9) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा संस्थानात अकाउंटट अधिकारी असताना एक चिल्लर चपरासी त्यांच्या टेबलावर दुरून फाईल फेकून देतो. त्या आफिस मधील मठातील पाणी पिण्यास तेथील एक सामान्य कारकून त्यांना मनाई करतो.घरमालक पारशी ताबडतोब घर सोडून जाण्यास सांगतो.    कोणत्या  आधारावर जातीच्या  की आर्थिक  ? 
(10) आजच्या तारखेत 2016 मध्ये सुध्दा प्रथम क्रमांकाने  SC.ST.  व धर्म परिवर्तीत मूलनिवाशी जातीचा द्वेष केला जातो.   दुसर्‍या क्रमांकावर ओ.बी.सी. धर्म परिवर्तीत मूलनिवाशी    त्यांचे हक्क अधिकार नाकारले जातात. त्यांच्यावर  अन्याय अत्याचार केले जातात.  जगाच्या पाठीवर कुठेही जाती व्यवस्था नाही. तिकडे वंश वाद आहे. जाती वाद नाही. काळे ,गोरे वाद आहे. परंतु आपल्या देशातल्या सारखा नाही. त्यांना एक मेकांचा स्पर्श चालतो, ते आपसात सोयरीकी  करतात.  सर्व प्रकारचे व्यवहार मनापासून  करतात.जगात कोठेही आर्थिक  आधारावर आरक्षण नाही.  फाॅरेन मध्ये जाती नसल्यामुळे वंशाच्या आधारावर आरक्षण आहे. तेथे त्याला "एफरमेटीव एक्शन " म्हनतात.  आपल्या देशात ब्राह्मणांनी मोठ मोठे धर्म ग्रंथ रामायण,महाभारत, मनुस्मृर्ती, पुराणे लिहिले. त्यामध्ये    शुद्र अतिशुद्र म्हणजे आजचे    sc.st.obc.nt.vjnt   अल्पसंख्याक  धर्म  परिवर्तीत मूलनिवाशी  यांना शिक्षण,  सत्ता, संपत्ती, पासुन वंचित ठेवले होते. एखाद्याने शिक्षण, सत्ता, संपत्ती  घेण्यासाठी प्रयत्न केला तर त्याला देह दंडात्मक शिक्षा देण्यात येत होती. "मानवी जीवनात प्रगती करायची असेल तर त्याला शिक्षण, सत्ता, संपत्ती अत्यंत आवश्यक मुलभूत गरजा  आहेत. आणि ह्या मुलभूत गरजा  ब्राह्मणांनी  जातीच्या निकषावर नाकारल्या. आणि म्हणूनच  
जातीच्या निकषावरच आरक्षण पाहिजे. 
तसेच महत्त्वाचे म्हणजे आरक्षण हा गरीबी मिटविण्याचा कार्यक्रम  नाही तर प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे.

व्यवस्था परिवर्तन की लडाई लडने के लिए इसे समझना अनिवार्य है।


*व्यवस्था परिवर्तन की लडाई लडने के लिए इसे समझना अनिवार्य है।*


✍🏽 *बहुजनों संगठन शक्ती का निर्माण करो* !

*यह दुनिया जितना सच्चाई का साथ देती है*।
*उससे सैकड़ों गुना ज्यादा "शक्ति" का साथ देती है*।
*जीत सत्य की नहीं शक्ति की होती है*।

*Power* *Power* 👥👥👥👥👥👥

*लोग शक्ती के साथ होते है*।
*शक्ति का साथ देते है*।
*शक्ति से डरते है*।
*शक्ति का आदर करते है*।
*शक्ति की सुनते है*।
*शक्ति से प्रभावित होकर शक्ती से जुडते है।*
*शक्ति के लिए काम करते हैं*।
*शक्ति को सलाम करते है*।
 
*न्याय की लडाई में "सत्य" हमारा सबसे बडा हथियार होता है । इसलिए हमें "सत्य" को कभी नहीं छोडना चाहिए । लेकिन उसके साथ - साथ हमे संगठन शक्ति का निर्माण करना चाहिए*।
*नहीं तो सत्य हमारे साथ होने के बावजूद*
*राजनैतिक शक्ति,*
*जन शक्ति,*
*अर्थिक शक्ती जिनके पास है । उन लोगों के द्वारा हम पराजित होते हैं*
*गुलाम बनाये जाते है।*
*दुनिया पर सत्य का नहीं शक्ति का राज है।*

*शक्ति का प्रभाव होता है*।
*प्रभाव से शक्ति का निर्माण होता है* ।

*शक्ती निर्माण करने के लिए*
*शक्ति का निर्माण और उसका समय समय पर प्रदर्शन करने से और ज्यादा जन शक्ति का निर्माण होता रहता है*।

*👤जनशक्ति सबसे बडी शक्ति है।👤*

*कभी अपने संगठन के बारे में नैगेटिव बातें ना करें ,*
*क्योंकि डूबती हुयी नैया में कोई सवार नहीं होना चाहता*।
*इसका सबको ध्यान रखना चाहिए*।

✍🏽 *नेतृत्व*( *Leadership*)-शक्ती से ही शक्ति का निर्माण होता है*।
*नेतृत्व शक्ति का निर्माण करता है।*
*असली शक्ति इंजिन में होती है।*
*डिब्बों में नहीं। इंजिन नहीं होगा तो डिब्बे कहीं नहीं जा सकते*।
*नेतृत्व दिशा देता है*।
*नेतृत्व लेके जाता है*।
*नेतृत्व संगठित रखता है*।
*नेतृत्व नियंत्रित रखता है*।
*नेतृत्व प्रेरित करता है*।
*नेतृत्व उदाहरण बनता है*।
-
-
-
*नेतृत्व एक विचार है।*
*नेतृत्व एक वृत्ती है*।
*नेतृत्व त्याग है।*
*नेतृत्व जिम्मेदारी है।*
*नेतृत्व एक समझ है।*
*नेतृत्व एक प्रभाव है।*
*नेतृत्व एक शक्ति है।*
*नेतृत्व का समानार्थी शब्द "त्याग" है*।
*Greatness brings responsibilities*.
*महानता जिम्मेदारियां लेके आती है*।
*जो निभाता है।उसके साथ ही रहती है*।

 *##एकच पर्व बहुजन सर्व##*
   *#बहुजन क्रांती मोर्चा#