Monday, 13 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 8}





इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 8}

सृष्टिक्रमाप्रमाणे पर्जन्य कोणत्याही एका देशाचे एका भागावर पडला तर दुसरे भागावर पडत नाहीं. याप्रमाणे एका भागावर आहे तर दुसऱ्या भागावर नाही. याजमुळे शेतकरी लोकांस दहा पंधरा वर्षांआड पिकापाण्याची तूट पडते आणि अशी तूट पडली म्हणजे कित्येक शेतकरी लोकांनी आपले शेतांतील आदले वर्षीचे पीक, जें सुमारें सर्व कुटूंबातील मानसांस वर्ष  सहा महिनेपर्यंत पुरण्यासारखें असतें, तेवढें खाऊन टाकिलें म्हणजे त्यांचेजवळ दसुरे वर्षाकरितां बी भरण्यास एक पैसा देखील नसतो. अशा प्रसंगीं ब्राह्मण व मारवाडी सावकार या लोकांची जी बनून जाते, ती सांगतां पुरवत नाही. ते अशा नडींत सांपडलेलें कुणबयांस आपले परम प्रियकर मित्र समजून मोठा आनंद पावतात आणि त्यापैकीं ब्राह्मण सावकार त्यांचे घरीं जाऊन विचारतात कीं, “का पाटील, आपण चिंतेंत आहां असें दिसतें, याचें कारण काय?” “महाराज, काय सांगावे? गेले वर्षी पाऊस पडला नाहीं म्हणून त्याचे पलीकडचे सालीं जें कांहीं पीक झालें होतें, तें अद्यापपावेतों खात आलों; अललकडेस कांहीच जवळ राहिलें नाहीं आणि पेरणीची वेळ तर जवळ येऊन पोहोचली. आतां काय करावें?" असे त्यांनीं त्यांस सांगावे. तें ऐकून ब्राह्मण सावकारांनीं म्हणावें कीं, “काहीं चिंता नाहीं. आपणांस बीं भरण्याकरितां जर दहा-बारा रुपये लागत असतील तर मी देतों.” आणि अर्थात ते गरीब बिचारे शूद्र लोक, हा सावकार आपला कांहीं परिचय नसतांना ज्या अथी घरीं येऊन आपणांस दहा-बारा रुपये घ्या, असें म्हणतो आहे, त्या अथीं यानें कांहीं तरी घर घेण्याचा कपटरूप खोल विचार योजला असावा, हें पूर्ण लक्षांत न आणतां, तूर्त आपली पैशांची गरज होते, याजकडेच सर्व लक्ष देऊन आपणांस दहा-बारा रूपये देण्याविषयीं त्यांस विनंती करितात. सावकारहि ‘ठीक आहे’ असे म्हणून "उद्या येते वेळेस स्टांप घेऊन या व आपले कोणी भाऊबंद अथवा मुलेंबाळें असलयामुळें त्यांसहि बरोबर घेऊन या, बरें पाटील! म्हणजे तुमचें काम मी खास करून देतों. पाटीलबुवा, मी आपणांस कागद वगैरे आणावयास सांचगतले, त्याबद्दल मनामध्यें कांहीं एक आणूं नका. माझा तुमच्यावर पूर्ण भरंवसा आहे. मी कांहीं तशांतला नव्हे, कितीहि केलें तरी तुम्ही व आम्हीं एका गांवच. तुमचा आमचा एक धर्म असून तुमच्याबरोबर का मी, अन्याय करीन? अरे राम! असें स्वप्नांतदेखील आणावयास नको. तुमच्याविषयीं माझे मनांत तसेंच करणें असतें तर मी तुमच्या घरीं चालून येऊन ‘तुम्हांस कांहीं अडचण आहे काय, जर असेल तर मी आपणांस पैशानें मदत करतों' असे म्हटलें असतें काय? कधींहि नाहीं.” या रीतीनें वरवर गोड बोलण्याचा पाल्हाळ लावून इकडून तिकडून त्याचे जवळून कागद लिहून घेईतोंपर्यंत समजूत करावी. दसुरे दिवशीं त्यांनी स्टांप आणल्यानंतर कुलकर्णी वगैरे लोकांकडून त्यांजमध्यें नानाप्रकारच्या अटीं घालून ललहून घ्याव्या आणी त्याजवर त्यांची व त्याचे भानबंदांची किंवा मुलांची सहीसाक्ष घेऊन त्याचे हातावर लिहणावळीचा वगैरे खर्च कमी करून दहा-बारा रुपयांबद्दल नऊ -दहा रूपये ठेवावे. तो कागद लिहून त्यांस कांहीं दिवस लोटल्यानंतर त्याचें व्याजमुद्दल जरी त्यांस मिळून चकुलें, तरी त्या व्याजाचें व्याज आणि त्याचें पडव्याज जुळून त्याच्या मुलाच्या लग्नाकरितां थोडेसे नवीन पैसे देऊन, त्याजबद्दल नवीन कागद लिहून घ्यावा. पुढें कांहीं दिवसांनीं त्याचें व्याज जुळून पुन: त्याचा नवीन कागद घ्यावा. येणेंप्रमाणें क्रम चालून त्या गरीब बिचाऱ्याच्या अंगावर तीन-चार वर्षांत सुमारें दोनशें-अडीचशेंची रक्कम फुगली, म्हणजे त्याजबद्दल सरकारांत फिर्याद टाकून त्याजवर खर्चसूद्धां तीनशें अथवा सव्वा तीनशें रूपयांचा हुकमनामा करून, ऐन धान्य वगैरे काढण्याची वेळ आली कीं, त्याच्या शेतीवर जप्ती आणून बसवावी.
       हरहर! अशा प्रसंगीं जो कांहीं द: खांचा देखावा दृष्टीस पडत असतो, तो पूर्णपणें शब्दमात्रेंकरून वर्णन करण्यास अशक्य आहे. गरीब, अनाथ, दीन अशा त्या शेतकऱ्यानें आपले
मुलांबायकांसह वर्तमान वस्त्रान्नाचे मोठे हाल सोसून सर्व वर्षभर एकसारखे भर उन्हांत व पावसांत आणि थंडीत रात्रीचा दिवस करून शेतांत कष्ट केले आणि त्या कष्टाचें आतां कांहीं थोडेसें फळ घेणार, तों इतक्यामध्यें सावकाराची स्वारी बरोबर कारकून, शिपाई घेनन उभी ठाकते, तेव्हां काय विचारावयाचें! त्या शेतकऱ्यास व घरातील सर्व मुलेंमाणसांस तो सावकार–सर्वांचा प्राणहारक यमरूपी ब्रह्मराक्षस–आक्राळविक्राळ रूप धारण करून, कारकून शिपायादि आपले दतांसह आमचे प्राण घेण्यासच आला काय, असें वाटतें. मुलाबाळांचा रडण्याचा एकच कल्होळ होऊन जातो. बायका घाबरून जाऊन नेत्रांतून टपटप अश्रधारा गाळीत असतात; व तोहि आपलें कपाळ पिटून रडत असतो. त्या सर्वांवर त्या काळीं द:खाचा डोंगर कोसळून पडतो. ते दाही दिशा आठवून ईश्वराची प्रार्थना करितात कीं, " प्रभो, असा वाईट प्रसंग आमचे सप्तजन्मींचे हाडवैऱ्यासदेखील प्राप्त न होवो!” सावकरानें घरांतील धान्यें वगैरे सामान बाहेर काढलें, म्हणेज शेतकऱ्यानें पटापट त्याचे पायावर डोकें ठेवनू अनेक प्रकारें प्रार्थना करावी, परंतु व्यर्थ! स्त्रियेनें केविलवाणें तोंड करून सावकरापुढें पदर पसरून ववनंती करावी कीं, “महाराज आपलें व्याज मुद्दलासह केव्हांच फिटलें आणि पुन: आपण पुन्हा व्याजाचें व्याज करून आमच्यावर एवढी रक्कम केलीत. बरें, ती देण्यास आम्हीं कबूल आहोंत, परंतु कृपा करून तजविजीनें घ्याल, तर आमचे गरीबाचा तरणोपाय लागेल. नाहींतर आमचा सर्वस्वी उन्हाळा होऊन घरचे सर्व मनुष्यांची दशा दशा होईल आणि हीं अनाथ दोन-दोन, तीन-तीन वर्षांचीं मुलें अन्न अन्न करून प्राण सोडतील. आतां तुम्हीच पहात अहां कीं, या मुलांच्या अंगावर थंडीवारा निवारणार्थ एक हातभरदेखील फडकें नाहीं. त्याचप्रमाणें त्यांचें खाण्याचीहि मोठी दशा आहे आणि आपण हा सर्व माल घेऊन गेल्यावर या बालकांची काय दशा होईल? त्यांनीं आपलें दीनमुख कोणापुढें पसरावें? महाराज, आपले ठायीं दया, क्षमा, आणि शांती हे गुण मुर्तिमंत वास करीत आहेत. आपण दीनानाथ, दीनबंधू आहांत आणि त्याच गुणांमुळें आपणांस भूदेव म्हटलें आहे. याजकरितां या गरीब बालकांची तरी दया घेऊन त्यांचे पोटापुरतें कांहीं थोडेंसें धान्य ठेवा, अशी मी आपणांस हात जोडून, पायां पडून विनंती करीत आहे. तिचा अव्हेर करणें हे आपणांस सर्वथैव अनुचित आहे.”

No comments:

Post a Comment