इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -5}
आतां त्यांचे स्त्रियांचे पोशाखाविषयी विचाराल, तर तो सांगण्यास आम्हास मोठें दुःख वाटतें. त्या बिचाऱ्या त्यावर काय समजून आपले दिवस काढीत असतील ते असोत, परंतु यांच्याकडुन त्यांस तिळमात्र देखील सुख मिळत नसे. बिचाऱ्यांसएखादा जाडा सुमारे दोन किंवा अडीच रूपये किमतीचा मिळाला, तर त्यांस एक दोन वर्षांपर्यंत घालवावा लागे. त्यास सोडवणीला दुसरें एखादे लुगडें किंवा वस्त्रदेखील नसे, आणि पाठीमागे कामाचा रगाडा असल्यामुळे तेंच लुगडें त्यास चार चार, पाच पाच दिवस न धुतां तसेंच नसावे लागे.एखादे वेळेस कामांतून सवड सांपडली, तर नदीवर जाऊन नेसलेल्या लुगडयाचा अर्धा भाग मोठ्या लज्जेने दुःखित होतांना अंगावरचा काढून तो प्रथमतः धूवावा. त्याप्रमाणे तें लुगडेंजीर्ण होऊन फाटत चालल्यामूळे प्रथम अंगावरील अध्र्या भागास शिवावे व तो नेसल्यानंतर दुसरे नेसलेले अध्र्या भागास शिवावे. पुढे ते लुंगडे फाटून फाटून त्याचा सात किंवा आठ हात लांबीचा धडपा राहून त्यास इतकीं ठिगळे असावयाची की, मुळचे हे कोणत्या रंगाचे लुगडे होते हे सांगता येत नसे. अशा प्रकारच्या अंगास अपुरत्यालुगडयाचा धडपा मोठे कष्टांनी नेसून डोळ्यावर गोवऱ्यांची पाटी घेऊन भर बाजारांत जावे. हरहर! कितीही दु:खाची गोष्ट आहे बरे!
ही सांगते वेकेस शूद्र लोकांचे अंतःकरणाचे शतशःतूकडे तूकडे होत असतील यांत कांही संशय नाही. त्यांस असे वाटत असेल कीं, आम्ही या जन्मांत व्यर्थ आलों. बेहत्तर, आम्ही जन्यतांच मेलों असतो, तर फार बरे होतें. परंतू आपाले समक्ष आपले स्त्रियांची अशी दशा पाहणे नको. एक वेळ मनुष्य आपणास कसेहि संकट असो. शरिरास मोठे क्लेश होत असोत, तथापि ते सर्व सहन करु शकेल; परंतू आपले प्रिय जनांचे हाल होत आहेत, हेकधाहि। तो सहन करू शकणार नाही. ते पाहताक्षणीच तो केवळ मृतप्राय होतो. असे जरी त्यांस वाटत असेल तरी ते गरीब लोक करतात काय? निरूपायाची गोष्ट पडली. बरें, त्यांस खाण्यास तरी चागले असते काय?
(Next page coming soon)

No comments:
Post a Comment