Saturday, 25 February 2017

शिवाजींचा पवाडा - लेखक (Author) जोतीराव फुले {Page -2}



--::     शिवाजींचा पवाडा    ::--


                    ॥ चाल॥
जो जो जो जो जो जो गाऊं, जी जी जी जी जी जिजी गाऊं।
चला वेरूळास जाऊं, दौलतबादा पाहूं ॥

मूळ बाबाजीस ध्याऊं, किर्ती आनांदाने गाऊं ।
सरदारात उमराऊ, सोबतीस जाधवराऊ ॥

पाटील होते गांवोगाऊ, पुत्रावरी अती जीऊ ।
थोर विठोजी नांव घेऊं , सान मालोजी त्याचा भाऊ ।
दीपाबाई त्यास देऊं , छंदाजोगा गिती गाऊं ॥

                     ॥ चाल ॥
मालोजी राजा । तुबा बा आजा ॥
यवनी काजा । पाळिल्या फौजा ॥
लाविल्या ध्वजा । मारिल्या मौजा ॥
वेळेस मुक्का । साधल्या बुक्का ॥
विचरी पक्का । जाधवा धक्का ॥
शेशाप्पा नायका । ठेविचा पैका ॥
द्रव्याची गर्दी । चाांभारगोंदी ॥
देवळें बांधी । तळीं ती खांदी ॥
आगळी बुद्धि । गुणानें निधी ॥
लिहिलें विधी । लोकांस बोधी ॥
संधान साधी । जसा पारधी ॥
भविषी भला । कळलें त्याला ॥
साांगोनी गेला । गादी बा तुला ॥
उपाय नाहीं जाणोन चाकर झाला यवनाचा ।
शिपाई होता बाणीचा ॥
खोठ्या दैवा कोण खोडी बेत देवाजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपिी शिवाजीचा ॥१॥

वडील बंधू संभाजीनें लळे पुरवीले ।
धाकटयासवें खेळले ॥

उभयतांचें एकचित्त तालमींत गेले ।
फरीगदग्या शिकले ॥

आवडीनें खमकोठी कुस्ती पेंचानें खेळे ।
पवीत्रे दस्ती केले ॥

द्वादशवर्षी उमर आली नाहीं मन धालें ।
घोडी फिरवूं लागले ॥

आट्टल घोडेस्वार भाला बोथाटी शीकले ।
गोळी निशाण साधले ॥

कन्या वीर जाधवाची जिनें भारथ लावलें ।
पुत्रा नीट एेकिवलें ॥

अल्पवयाचे असतां शिकार करू लागले ।
माते कौतुक वाटले ॥

नित्य पतीचाआठव डोंगर दुःखाचे झाले ।
घर सवतींनें घेतले ॥

छाती कोट करून सर्व होतें साटिवलें ।
 मुखमुद्रेने फसविले ॥

चतुर शिवाजीनेंआईचें दुःख ताडिले ॥
पित्यास मनीं त्यागिले ॥

पुत्राचे डोळे फिरले मा तें भय पडलें ।
होत उपदेशा योजिले ॥

मनीं पतिभक्ती पुता बागेमधीं नेलें ।
वृक्षाछायी बसीवलें॥

पूर्वजांचे स्मरण करून त्यास न्याहाळीलें ।
नेत्री पाणी टपटपलें ॥

या क्षेत्राचे धनी कोणकोणी बुडविले ।
सांगते मुळी कसें झालें॥

क्षेत्रवासी म्हणोन नांव क्षत्रिय धरले ।
क्षेत्री सुखी राहिले ॥

अन्यदेशिंचे दंगेखोर हिमालयीं आले ।
होते लपून राहिले ॥

पाठी शत्रूभौती झाडी किती उपासीं मेले ।
गोमासा भाजून धाले ॥

पाला फळें खात आखेर ताडपत्रा नेसले ।
झाडी उल्लंघून आले ॥

लेखणीचा धड शीपाया सेनापति केलें ।
मुख्य ब्रह्मा नेमलें॥

बेफाम क्षेत्रिय होते अचकू टोळ उतरले ।
कैदी सर्वास केलें ॥

सर्व देशीं चाल त्याचें गुलाम बनीवले ।
डौलानें क्षुद्र म्हणाले ॥

मुख्य ब्रम्ह राजा झाला जानें कायदे केले ।
त्याचे पुढे भेद केले ॥

ब्रह्मा मेल्यावर परशराम पुंड माजले ।
उरल्या क्षत्रिया पिडीले ॥

माहारमांग झाले किती देशोधडी केले ।
ब्राह्मण चिरंजीव झाले ॥

देश निक्षत्रिय झाल्यामुळें यवना फावलें ।
सर्वांस त्यांही पिडीलें ॥

शूद्र म्हणती तूम्हा हृदयीं बाण टोचले ।
आज बोधाया फावलें ॥

गाणें गाते ऐक बाळा तुझ्या आजोळीं शिकले ।
बोलीं नाहीं मन धालें ॥

                      ॥ चाल ॥
क्षेत्र क्षत्रियांचे घर, तुझे पितृ माहावीर ।
सुखा नसे त्यांच्या पार, आल्यागेल्याचें माहेर ॥

शीखराकार डोंगर, नानावल्ली तरूवर ॥

दरीं खोरीं वाहे नीर, खळखळे निरंतर ।
झाडा फुलें झाला भार, सुगंधी वाहे लहर ।
पक्षी गाती सोळा स्वर, मंजूळ वाणी मनोहर ॥

नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार ।
भूमी अती काळसर, क्षेत्र देई पीका फार ॥

धाव घेती दंगेखोर, दिला क्षेत्रियास मार ।
दास केले निरंतर, ब्रह्मा झाला मनीं गार ॥

लोभी मेले येथें फार, विध्वा झाल्या घरोघर ।
उपाय नाहीं लाचार, स्त्रिया बंदी पाटावर ॥

दसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर ।
मार त्याचाअनीवार, केला क्षत्रियां संव्हार ॥

क्षत्रिय केले जरजर, भयें कांपे थरथर ।
दुःखा नाहीं त्यांच्या पार, ठाव नाहीं निराधार ॥

बहु केले देशापार, बाकी राहि मांगमाहार ।
नि:क्षेत्री झाल्यावर, म्लेंच्छें केलें डोकें वर ॥

आले सिंधुनदीवर, स्वाऱ्या केल्या वारोंवार ।
गातें कटावांतसार, लक्ष देई अर्थावार ॥

                  ॥ चाल ॥
काबुला सोडी । नदांत उडी ॥
ठेवितो दाढी । हिंदूस पीडी ॥
बामना ओडी । इंद्रिये तोडी ॥
पींडीस फोडी । देऊळें पाडी ॥
चित्रास तोडी । लेण्यास छेडी ॥
गौमाांसी गोडी । डुकरां सोडी ॥
खंडयात ताडी। जेजुरी गडीं ॥
भुंग्यास सोडी । खोडीस मोडी ॥
मूर्तीस काढी । काबूला धाडी ॥
झाडीस तोडी । लुटलीं खेडीं ॥
गडांस वेढी । लावली शीडी ॥
हिंदुस झोडी । धर्मास खोडी ॥
राज्यास बेडी । कातडी काढी ॥
गर्दना मोडी । कैलासा धाडी ॥
देऊळें फोडी । बांधीतो माडी ॥
उडवी घोडी । कपाळा आढी ॥
मीजास बडी । ताजीम खडी ॥
बुरखा सोडी । पत्नीस पीडी ॥
गायनीं गोडी । थैलीते सोडी ॥
माता मनीं ठसतां राग आला यवनाांचा ॥
बेत मग केला लढण्याचा ॥
तान्हाजी मालुसरे बाजी पासलकराचा ॥
स्नेह यशजी कंकाचा ॥
मित्रां आधीं ठेवी जमाव केला मावळयाचा ॥
पूर करी हत्यारांचा ॥
मोठ्या युक्तिने केला किल्ला तोरण्याचा ॥
रोवला झेंडा हिंदूचा ॥
राजगड नवा बांधला ऊंच डोंगराचा ॥
भ्याला मनीं विजापुराचा ॥
दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीच ॥
दादोजी कोंडदेवाचा ॥
मासा पाणीं खेळे गुरु कोण असे त्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥ २ ॥

Next Page



Advertisement

The "Hidden Survival Muscle" In Your Body Missed ByModern Physicians That Keep Millions Of Men And WomenDefeated By Pain, Frustrated With Belly Fat, And StrugglingTo Feel Energized Every Day…


No comments:

Post a Comment