Wednesday, 15 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 9}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 9}

      इतकें तिचें भाषण ऐकून महाराजांनीं रागावून डोळे लाल करून म्हणावें कीं, “काय गे मूखे, शूद्रीण होऊन तूं कां आम्हांस ज्ञान सांगतेस? तुझे मनांत आम्ही आपलें कर्ज सोडून द्यावें, मागूं नये. स्वस्थपणें आम्ही आपले घरीं बसावें म्हणजे झालें!” हे त्याचे शब्द ऐकून बिचारीनें हुं चूं न करितां उगीच बसावें. त्याचिमाणे घरचे सर्व मनुष्यांनीं त्याचीं विनवणी करावी. परंतु तोतिच्याकडसे लक्ष न देतां आपण आरंभलेला दष्ट हेतु सिद्धीस न्यावा, म्हणून सर्व माल गोळा करून, जो वसूल होईल तो, रकमेतून वजा देऊन, बाकीबद्दल पुन: त्याचमाणें दुष्ट क्रम चारपांच वर्षांपर्यत चालला, म्हणजे त्या गरीब बिचाऱ्या या शेतकऱ्याची फारच दुर्दशा होऊन जात असे. त्या एका लहान अशा सात-आठ रुपयांचे रकमेकररतां त्याचें सर्व शते जाई. गुरेंढोरें जात, विहिरीमळे जात आणि सरतेशेवटीं तो हि देशोधडी जाण्यास अथवा आपले प्राणत्याग करण्यास सिद्ध होई. असो, ह्या ब्राह्मण वगैरे सावकारांनीं आपले या इंग्रज सरकारचे दयाळू राज्यांतहि त्या गरीब शूप द्रांजवळून व्याज मुद्दलासुद्धां पैसा जरी घेतला, तरी त्यांस धुळीस मिळवीत तर स्वकीय राज्यामध्यें, त्यांस जेव्हां एक वर्ष पाऊस न पडलयामुळें असा कर्ज काढण्याचा प्रसंग पडे, तेव्हां ते त्यांची काय दशा करीत असतील याची, सूज्ञ जनहो, तुम्हीच कलपना करा.
        त्या वेळेस त्या सरकारांत फर्याद वगैरे करावी लागत नसे. कारण त्यांचे घरांतच सरकार होतें. मनास वाटेल त्याप्रमाणें कुळास मारावें, झोडावें, त्याचा माल सर्व हिसकावून घेऊन जावा, त्याचीं बैलंढोरें विकांवीं, त्याचे माणसांचें हालहाल करावे, ते त्याचे प्राण जाईंतोपर्यंत पाहिजे तसें करीत. त्याचे डोक्यावर अथवा पाठीवर मोठें थोरले धोंडे देऊन त्यास भर उन्हामध्यें उभे करीत आणि खालून मिरच्यांचा धरू देत. त्याचे शरिराचे नाजूक भागास चाप लावीत व कोलदांडी घालून त्यास बेदम मार देत. सदरहूमाणेंच त्या वेळचे सरकारचे ब्राह्मण कामगार करपट्टी वसूल
करतेवेळीं त्यास नानाकारचे जाच करीत असत.
       तथापि हल्लींचे कित्येक सुधारलेले विद्वान आर्य ब्राह्मणांची, स्वकीय पेशवाई जुलुमांविषयी पक्की खात्री झाली असून, केवळ आपल्या जातबांधवांच्या भयास्तव, आर्य ब्राह्मणांचे त्रासापासून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांची मुक्तता झाली. हे स्पष्टपणें उघड म्हणण्याची त्यांची छाती होत नाहीं. सबब कशी तरी वेळ मारून नेण्याकरितां मोठ्या सार्वजनिक सभास्थानीं उभें राहून, “पूवीपेक्षां हल्लीं या तीस वर्षात शूद्र शेतकऱ्यांची स्थिती बरी आहे,” म्हणून जागोजाग व्याख्यानें देत फिरणारे व इंग्रज सरकारचे आपणांवर शतश: उपकार असून त्यांपैकीं कित्येक नावालासुद्धां न स्मरतां, राज्यास स्वाभाविक असणारे शुल्लक दोषांना सूक्ष्मदर्शक यंत्रदृष्टीनें दाखविणारे जे कोणी आहेत व कित्येक वेडगळ जुन्या समजुतीचे आर्यभट ब्राह्मण फक्त जात्याभिमान दृढ मनीं धरून, त्यांचा पक्ष उचलल्यामुळें त्यांस सदगुणांचे ओढूनताणून नकली रूप देण्यास झटणारे हललीं सांगत आहेत कीं, “पूवीं पेशवाईंत शूद्र शतेकऱ्यास जें सौख्य होतें तें सागंतां येत नाही. त्या सुखाचें हल्लीं लेश सुखदेखील नाहीं. त्या वेळची शूद्रांची राहणी काय, चालणी काय, रीतीभाती काय सर्वच चांगलें होतें. सत्य, सदगुण, सदाचार, प्रामाणिकपणा आणि धर्म हे गुण शूद्रांमध्ये अक्षय वास करीत होते. त्या वेळीं शूद्र शतेकऱ्यांजवळ पैसा तरी किती असे कीं, ‘ जिकडे पहावें तिकडे शूद्रांच्या घरांतून सोन्याचा धरू निघत असे.’ आतां तें सौख्य नाहींसें झालें. ती नीतत नाहींशी झाली, तो धर्म नाहींसा झाला आणि ती संपत्तीही नाहींशी झालीं.” या उभयतांचे बोलण्यांत किती तथ्यांश आहे, याविषयीं विचार करणें वाचकांकडे सोंपवून येथें विषय संपवितो.

जोतीराव गोविंदराव  फूले
15 जून, सन 1885  इ.
पूणे पेठ जूनागंज
घर नंबर   395

No comments:

Post a Comment