इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page - 6}
स्वम्मातदेखिल आणावयास नको. दररोज जंधळ्याच्या, नाचख्याच्या अथवा बाजरीच्या भाकरी नुसते मिठाचे खडयाबरोबर, मिरचिबरोबर किंवा कांद्याबररोबर खाव्या लागत. वेळेस भाजीस तेल मिळाले तर मीठ मिळु नये, मीठ मिळालें तर मिरची मिलूं नये. कधी जोंधळयाच्या किंवा नाचण्याच्या कण्या भरडून त्याचा घाटा करून गिळावा. कधी नूसती भाजीच उकडून खावी त्यावर आपला गुजारा करावा आणि कधी कधी तर फक्त पाणी पिऊन व पोट दोरीने आवळून शेतांत खपावें लागत असे.
अशा प्रकारें दारिद्रयाने ग्रस्त प्रजेचा पैसा (अतिशय कष्टांनी मिळविलेला पैसा कररूपाने हरण करून) तची व्यवस्था वर सांगितल्या प्रमाणे आपले जातीचे आर्य लोकांस जेवण घालज्याकडेस करावी, म्हणजे मोठी निंद्य आणि कुनीतीची गोष्ट आहे. त्याच पैशाचा निदान थोडासा अंश तरी असे कालवे बांधण्याकडेस अथवा तशाच प्रकारची दुसरी सत्कृत्य करण्याकडेस उपयोग केला असता आणि बाकीचा सर्व पैसा आळसास उत्तेजन देण्यामध्ये खर्च केला असता, तरी त्यापासून प्रजेसबरेंच कल्याण होऊन ती अन्नवस्त्रास मोताद झाली नसती व .भटराजाचे कीर्तिलाहि कलंकल लागला नसता. त्यांनी शेतकरी लोकांचे शेतांस अशा रीतीने, म्हणजे कालवे वगैरे बांधून पाणी पुरविलें असतें, तर शेतामध्यें विपुल धान्ये वगैरे वेळचे वेळेस पिकून शेतकरी लोकांस सहज रीतीनें पाहिल्यापेक्षा दुप्पट, चौपट कर देण्याचें सामर्थ्य आलें असते आ आणि तेणेकरून भटराजे व ब्राम्हण लोकहि येथेच्छ लाडूचे भोजन जेवून उठल्यानंतर त्यांस रगड दक्षणा देण्यास समर्थ झाले असते. अथवा ब्राम्हणाने ओकारीखे येईतोपर्यत जेवण झाल्यानंतर, जे कोणी तितके लाडू खातील, त्या प्रत्येकास प्रत्येक लाडूमागें जेथे दहा दहा रुपये लावावयाला सांपडत, तेथे वीसवीस किंवा तीसतीस देखील रूपये देण्यात सांपडले असते; परंतू हा विचार त्यांस तूर्त स्वहीतबुध्दीमुळे सुचला नाही.
त्या वेळेस कनालवगैरे नसल्यामूळे शेतकरी लोकांची मोठीच दुर्दशा होऊन जात असे. जिचा परिणाम अद्यापपावेतों त्या लोकांपैकी शेकडों गरीब लोकांस सोसावा लागत आहे. हल्लीं ज्या ज्या देशास शेतकीचा कामाला पाणी देण्याकरीता असे कनाल नाहींत, त्या देशांतील शेतकीचें काम करण्यास मोठी गैरसोय असे म्हटलें पाहिजे, व त्यांस आपले ( शेतकीच्या कामावर अवलंबून, आपलेदारे दरिद्रयावस्थेत) देशांत कनाल होईतोंपर्यंत मूक्त होण्यास दुसरा मार्गहि नाहीं. बहुतेक लोकांस ठाऊक आहे कीं, नवीन सरकारचे देशांत शेतकीचें काम बहुतकरून कनालवरच चाललेले आहे. आणि त्यांजमूळे तेथील शेतकरी लोकांचीहि स्थिती फारच उत्तम आहे. त्याचप्रमाणे या देशांत निझाम सरकारचे राज्यात जेथें जेथें कनाल आहेत, तेथे तेथे कुणबी लोक चांगले खाऊनपिऊन सधन आहेत. शेतास अशा स्वल्प रीतीनें वेळेवर पाहिजे तितके पाणी देण्याची सोय नसल्यामुळे या देशाचे भागांतील कुणबी वगैरे शेतकीचे काम करणारे लोकांवर पूर्वी मोठे वाईट प्रसंग पडत असत. शेतकरी लोकांचे काम पाण्यावर फारच अवलंबून असते.

No comments:
Post a Comment