Wednesday, 8 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -4}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -4}

शंकडों वर्षे भट राजांनी प्रजेवर वाकेतोंपर्यंत कराचे ओझे लादून कोटयावधि रूपये घशांत हा टाकिले, परंतु त्याचा एक छदाम तरी ईश्वराला स्मरून तिच्या कल्याणाकडे लावायचा होता! हरहर!प्रजेपासून वसूल केलेल्या पैशांचा ज्या रीतीने त्यांनी व्यय केला ती सांगण्यास आम्हांस लज्जा वाटते. त्यांनी आपले जातीचे भट लोकांकरिता जागोजागी देवाची संस्थानें स्थापन करून तेथे त्याजकारिता अन्नछत्रे घातली, प्रजेकडून पैसा वसूल झाला की, लागलीच ब्राम्हण भोजनप्रीत्यर्थ अमुक संस्थानाकडेस दोनळक्ष रूपये, अमुक संस्थानाकडेस पन्नास हजार, येठोप्रमाणे ठराव करून पैसा वाटून घ्यावा. आणि दररोज पर्वतीसारख्या संस्थानावर आज काय, फक्त ब्राम्हणांन तूपपोळीचें जेवण व वर दहादहा रुपये दक्षणा, आज काय ब्राम्हणांस लाडूचें जेवण व वर वीसवीस रूपये दक्षणा, आज ब्राम्हणांस केशरभाताचें जेवन व वर ओगराळें भरून रूपये प्रत्यकास दक्षणा, याशिवाय कित्येक ब्राम्हणांस शालजोडया, कित्येकांस पागोटीं, कित्येकांस पागोटीं, कित्येकांस धोतरजोडे, कित्येकांस यथासांग वर्षासन देण्याच्या नेमणुका, अशा रीतोनें दररोज ब्राम्हणांस यथेच्छ भोजन घालून वर रगड दाक्षिणा देण्यात व बक्षिसे देण्यात प्रजेस अति दुःख होऊन वसूल केलेल्या सर्व पैशांची नासाडी करून टाकली होती.
      बरें, त्या वेळेस प्रजेची तरी खाऊन पिऊन सरकारी कर देण्याजोगी स्थिति होती काय ? मुळींच बोलावयास नको. तिची जी कांही दशा होती, ती सांगतां पुरवत नाहीं गरीब बिचारे शूद्र लोकांस रात्रंदिवसभर उन्हाळ्यात, पावसाळ्यांत आणि हिंवाळ्यात एकसारखे शेतांत कष्ट करावे लागत असे. त्यांचे अंगास जाडेभरडे वस्त्र किंवा पोटास जाडेभरडे अन्न देखील मिळण्याची मोठीमारामार पडत असे. डोक्सास पहावें तर फाटकी जीर्ण अशी वीस किंवा पंचवीस हात लांबीची चिंधी, जिला पामोटे म्हणण्यास मोठी लाज वाटते. अंगावर सर्व उन्हाळा- पावसाळाभर फाटलेली एखादी खरबरीत घोंगडी, पायांत पांचसात ठिकाणीं सांधलेला,वरून दोरीचे तुकडयाने बांधलेला फाटका जोडा, तोहि अगदीं जेव्हां भर उन्हाळा असेल तेव्हां मात्र घालावयाचा आणि तो संपला म्हणजे दुसरे वर्षाचे उन्हाळ्यास तसाच जनत करून ठेवावे. बाकी सर्व वर्षभर पायास जोडा म्हणून मुळीच माहीत नाहीं, फार काय सांगावें, नेसण्या कारता हात - सव्वाहात लांबीचे फुडकेंदेखील मिळव्याची भ्रांत. बाजारांतून एखादी दमडी टोलीची वस्तू आणणे झाल्यास ती आणण्याकरिता त्याचेच एक बाजूस अथवा पागोटयांत बांधावी, परंतू ती आणण्यासाठी दुसरें वस्त्रदेखील मिळू नये. ही त्यांचे खुद्द पोशाखाची संक्षिप्त हकीकत झाली. (Next page Coming Soon)

No comments:

Post a Comment