Tuesday, 7 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -3}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -3}

अशा प्रकारें मदांध होऊन प्रजेशीं क्रुर रीतीने वागणारे जे राजेलोक व त्यांचे जातीचे लोक यांची सत्ता सर्वशाक्तिमान जो परमेश्वर याने हरण
करुण त्यांस त्यांचे अपराधानूरूप शासन दिलें आणि कनवाळू होऊन आपले दुःखांनी पीडीत अशा शुद्रादी आतिशूद्र प्रजेसपरमन्यायी, हितावह , सौख्यकारक, सदाचारी आणि शांत असे राज्य इंग्रज सरकारच्या अंमलाखालीं प्राप्त करून दिले. सबब ती त्या प्रभूची फार फार ऋणी आहे व त्यास रात्रंदिवस अशी प्रार्थना करीत आहे कीं," हे प्रभो, आम्हांस हे राज्य चिरकाल असूं दे." कारण हे राज्य झाल्यामूळ प्रजेस पूर्वीच्या राज्यांत ( भटशाहीमध्ये ) जे कांहीं द्वेषामूळे, धर्मसंबंधाने, राज्य संबंधाने आणि दूसऱ्या अनेक गोष्टींच्या संबंधाने जुलूम होत असत, त्या सर्वांतून ती एकदाची सुटली
        हल्ली कोणत्याहि प्रकारे दुसऱ्याचे अनहित न होतां ज्या हितावह गोष्टी आहेत, त्या तिचे मनोदयानूरूप करण्यास तिजला उत्तेजन प्राप्त झाले आहे. .पूर्वी प्रजेने मिळविलेली मालमत्ता केवळ लुटारू लोकांपासून असुरक्षित होती.एवढेच नव्हे, परंतू लिजला मोठमोठया आधिकारी व राजे लोकांच्या पेंढारी लोकांपासूनहि अक्षय भीति असे आणि अर्थात लोकांस स्वकष्टातजित पैशाचा उपभोग घेण्यास किंवा त्याचा संचय करून ठेवण्यास अनेक अडचणी असल्यामूळे दिवसानूदिवस त्यांची उमेद खचत जाऊन ते आळशी, निरोद्योगी, दारिद्रयाने त्रस्त होत चालले होते तसेच हल्ली स्वमेहनतीनं संपादन केलेल्या पैशांस अगदी धोका नाही, म्हणून लोकांस आपले पैशाचा यथेच्छ रीतीने उपभोग घेतां येतो, त्याचा संचय करता येतो, त्याची मनास वाटेल त्याचप्रमाणे व्यवस्था करतां येते. सारांश, त्याजवर त्यांची सर्वस्वी मालकी असते.
     या कारणामुळेंत्यांनी आपला सर्व आळस टाकून पहावे तिकडे सरकारनें प्रजेच्या कल्याणाकरिता अनंत खटपटी करून अनेक सूधारणा केल्या आहेत आणि दररोज तिचे सुखाकरितां नानाप्रकारच्या गोष्टींची योजना चालविली.  आहे. पूर्वी प्रवास करणे म्हणजे लोकांसमोठे संकट वाटत असे; कारण त्या वेळेस प्रवासाचे कामांत अनेक अडचणी असत. हल्लीं सरकारने सडका वगैर नीट बांधून नीट बंदोबस्त केल्यामुळे त्या दूर झाल्या आणि लोकांस प्रवास करण्याविषयीं आनंद वाटूं लागला. त्याचप्रमाणे सरकारने प्रजेचे कल्याणाकरितां पूल बांधले. मोठमोठाली विद्यालये स्थापन केलीं, दवाखाने बांधिले. सर्व जातींचे गरीबगुरीब लोकांसाठी धर्मशाळा बांधिल्या, वगैरे शेकडों कृत्यें केली; परंतु त्या सर्वांमध्ये हल्ली जे कांही कृत्य प्रजेळारेतां सरकारनें हल्ली जे कांही कृत्य प्रजेकरितां सरकारनें हातांत घेतले आहे, तें फारच उत्तम असून मोठे स्तुत्य व सरकारास चिरकाल भूषणासद आहे. त्या कृत्यांचे महत्व फार काय विशेष सांगावें, परंतु ते कृत्य सरकारनें आरंभिल्यामूळे आज फार दिवसांपासून दारिद्रयाने गांजलेल्या प्रजेला उर्जितकाळच प्राप्त झाला आहे. तें कोणतें म्हणाल, तर जागोजाग डोंगराच्या आसपास खिंडी बुजवुन मोठमोठाले विस्तीर्ण पाण्याचे तलाव केले आहेत.
    त्या स्थळांपासून अनेक सुंदर कनाल काढून सरकार जागोजागी त्याचे पाणी सर्व आसपासचे गरीबगुरीब शेतकरी लोकांस अक्षय शेतकींचे कांम चालावें बज्या ठिकाणी मनुष्यास पाणी पिण्यास देखील मिळण्याची पंचाईत, ती दूर व्हावी, अशा कृत्याची फार दिवसांपासून गरज होती, ती ईश्वरकृपेने लवकरच घडून आली. (Next page coming soon)

No comments:

Post a Comment