Monday, 6 February 2017

इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -2}



इशारा - लेखक राष्ट्रपिता जोतीराव फुले {Page -2}

त्यांनी आपले अविचाराचे हेतू सिद्धीस जावे, म्हणून हातांमध्ये अंमलरूपी अति तीव्र कोरडा घेऊन या देशांतील हस्तगत झालेले दीन प्रजेचे अंगावर. फडाफड उडवीत गेले. त्या वेळेस ते प्रजेस, ज्या हितकारक व सौख्यकारक गोष्टी त्याजमध्ये सुधारणा न करिता, तिचा कसा छळ. करावा, त्याजमध्ये मोठे प्रवीण होते. इतिहासावरून पाहिले असता असे समजते की, कित्येकांनी एखाद्या मिथ्या व क्षुल्लक कारणांकरिता प्रजेपैकी शेकडो मनूष्यांस त्रस्त करून शेवटी त्यास मोठे दूष्ट रीतीने जिवामिशी मारावे, कित्येकांनी आपल्या दुष्ट वासना तृप्त करण्याकरिता कुलीन, पतिवृता आणि संदर अशा दुसऱ्याच्या स्त्रियांचा जुलूमाने अभिलाष धरावा आणि लहानसहान अपराधाकरिता मनुष्याचे हालहाल करून त्यास देहान्त शिक्षा द्यावी. या वेळेस मनूष्यास शिक्षा देण्याचाही मार्ग मोठा विलक्षण व भयंकर होता. याजविषयीं केवळ ऐकिले असता हल्लीच्या कालांतला कसाहि मनुष्य असला, तथापि त्याचे अंतःकरण कळवळून येऊन भयाने सर्वांगास काटा आल्याशिवाय राहणार नाही. पहा,सुळावर देणे हे किती घोर कृत्य आहे! त्याचे सुर्कसारखे अणकुचीदार अग्रावर मनुष्यास बसवून ते अग्रया मनुष्याचे मस्तक फोडून बाहेर निघेपर्यंत त्यास खाली ओढणे म्हणजे निदर्यतेची पराकाष्टा झाली. तसेच मनूष्यांचे अंग चाबूकाने अथवा झाडाचे फोकानें फोडून सर्वांगातून रक्त वाहावे तोपर्यंत मारून, त्याजवर मिठाचे अथवा चिंचेचे पाणीवरून शिंपडावे आणि त्यापासून त्यास अत्यंत व्यथा प्राप्त होऊन तो तरफडून कसा तळमळत आहे हे पहावें, अथवा त्याची मोट बांधून कडेलोट करणे, अथवा हत्तीस मस्त करून त्याचे पायास मनूष्यास बांधून या हत्तीस खडकाळ रस्तावरून फिरवणे ( प्रख्यात व पराक्रमी विठोजीराव होळकसारख्या वीराची निमकहराम पेशव्यांनी कशी दुर्दशा केली याची आठवण करा.) अथवा मनूष्याचे तोंडात तेल, शेंदूर अथवा शिसे पागळवून ओतणे वगैरे शिक्षा केवळ द्वेषामूळे अथवा यतकिंचित अपराधांमूळे प्रजेस सोसाव्या लागत. थोडकेच दिवसामागे म्हणजे आर्य पेशवे यांचे शेवटील कुलदीपक पुरुष रावबाजीचे कारकिर्दीचा अस्त होईतोपर्यंत, शेतकरी लोक शेतसारा देण्यास थोडेसे चुकले, तर त्यांस उन्हामध्ये ओणवेकरून पाठीवर एक मोठा दगडद्यावा, अथवा त्या शेतकऱ्याच्या बायकोस व्याच्या पाठीवर बसवावे आणि खालून त्यांस मिरच्यांचा धूर द्यावा. तात्पर्य, त्या वेळेस प्रजेस दुःख देण्याच्या कामांत जी कांही सूधारणूक झाली होती, ती अन्य देशांतील प्रजेच्या दू:खाशी तूळ ना करून पाहिली असता, हटकून पाहिले बक्षिस हिजला मिळायचेंच! व हयांचे जातीचे लोक प्रजेस कोणते रीतींने छळावेलिजला कोणते रीतीनें आधिक दुःख प्राप्त होईल, कोणता उपाय योजला असता तिचे अकल्याण होईल वगैरे शास्त्रांचा रात्रंदिवस एक भावानें, एक निश्चयाने जसे काय अभ्यासच करीत होते की काय, असे वाटते, प्रजेस दुःख देणे म्हणजे तिला मारणे, तोडणे, लुटणे किंवा त्रस्त करणे असा अर्थ समजत असत. प्रजेच्या अकल्याणात त्यांस मोठा संतोष वाटावा. ते प्रजा याचा अर्थ काडी, कस्पट, ढेकूण अथवा कांही एक प्रकारची जनावरे समजत. त्यांचा उपयोग म्हटला म्हणजे त्यांनी राजे व त्यांचे जातीचे लोकांकरिता, त्यांचे स्त्रियांकरितांव मुलाबाळांकरितां धान्य उत्पन्न करावे व वस्त्रे विणावीं, त्यांच्याकरिता उन्हातान्हांत खपावे आणि त्यांस ज्या ऐषआरामाच्या गोष्टी लागतात, त्या सर्व पूरवाव्यात, हयाशिवाय दूसरा कांही नाही, असो. (Next page coming soon)

No comments:

Post a Comment