Saturday, 18 February 2017

शिवाजींचा पवाडा - लेखक (Author) जोतीराव फुले {Page - 1}



LIFE OF SHIVAJI,
IN POETICAL METRE.
BY
JOTIBA GOVINDRAO PHULE.
—०—
पवाडा
छत्रपति शिवाजी राजे भोसले
यांचा,
जोती गोपवदंराव फूले यानी
लोकहितार्थ केला;
तो
मुंबईत
“ओररएन्टल” छापखान्यांत छापिला.
सन १८६९.



--::     शिवाजीचा पवाडा    ::--

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपति शिवाजीचा ।।

लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा।
काळ तो असे यवनांचा ।।

शिवाजीचा पिता शाहजी पुत्र मालोजीचा ।
ऐसे तो डौल जहागिरीचा ।।

पंधराशे एकूणपन्नासं साल फळलें ।
जुन्नर ते उदंयाशी आलें ।।

शिवनेरी किल्लामध्ये बाळ शिवाजी जन्मलें ।
जिजीबाइस रत्न सांपडले ।।

हातापायांची नख बोट शूभ्र प्याजी रंगीले ।
ज्यानीं कमळा लाविवलें ।।

वर खालीं टिऱ्या पोटऱ्या गांठी गोळे बांधले ।
 स्कटिकापरी भासले ।।

सानू कटी सिंहापरी छाती मांस दुनावलें ।
नांव शिवाजी शोभलें ।।

राजहौंसी उंच मान उनसे माघें मांदे दोंदीले ।
जसा का फणीवर डोले ।।

एकसारखे शुभ्र दंत चमकूं लागले ।
मोतीं लडीं गुतिवलें॥

रक्त नाजूक होटीं हासूं छपिवलों ।
म्हणोन बोबडें बोले ॥

सरळ नीट नाक विशाळ डोळ्यां शोभले ।
विषावें मृग वनीं गेले ।।


नेत्र तीखे बाणी भवया कमठे ताणीले ।
ज्याांनी चंद्रा हाटिवलें ॥

सुंदर विशाळ भाळवटी जावळ लोंबलें ।
कुरळे केंस मोघीले ॥

आजानबाहू पायाांपेक्षां हात लांबलेले ।
चिन्ह गादिचें दिसले ॥

जडावाचीं कडीं तोडे सर्व अलंकार केले ।
धाकटया बाळा लेविवले ॥

किनखाबी टंकोचें मोतीं घोसानें जडले ।
कलाबतुचे गोंडे शोभले ॥

लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले |
डाग लाळीचे पडलेले ॥

हातापायांचे आंगठे चोखी मुखामधी रोळे ।
पायीां घुगरूं खुळखुळे ॥

मारी लागोपाठ लाथाबुक्या आकाश शोभले ।
खेळण्यावर डोळे फिरीवले ॥

मजवर हा कसा खेळणा नाहीं आवडलें ।
चिन्ह पाळणीं दिसलें ॥

टाहीपेटे रडूं लागला सर्व घाबरले ।
पाळण्या हालवुं लागले ॥

धन्य जिजाबाई जिनें जो जो जो जो जो केले ।
गातो गीत तिनें केलें ॥

पूढील  पान - Next page -2





No comments:

Post a Comment