Thursday, 9 February 2017

संत सेवाभाया वत्यांची तांडा- संस्कृती गोर पनी बंजारा



संत सेवाभाया वत्यांची तांडा- संस्कृती गोर पनी बंजारा
         १५फेब्रुवारी १७३९हा दीवस सेवाभायाचा जन्म दीन गोलार डोडी तांडा (आंध्र प्रदेश) येथे रामावत भुकीया या कुळात जन्म झाला. बंजारा जातीचा मुख्य व्यवसाय म्हणजे बैलांच्या पाठीवर वोझे (माल)लादुन भारतभर व परदेशात व्यापर करने याला बंजारा बोलीत 'लदेनी (ओझे लादने) असे म्हनतात. गाय बैलाचे तांडेचे-तांडे बाळगून गोर-बंजारा भटकंती करायचा.म्हणूनच बंजारा वस्तीला तांडा असे नाव पडले.गोर-बंजारा लोकाची ही तांडा संस्कृती म्हनजे गणव्यवस्था संस्कृती अर्थातच मुळची सिंधू सभ्यता होय.अत्यंत विकसीत अशा सिंधू सभ्यतेवर परकीय आर्यांनी आक्रमण करून विध्वंस केल्याचा उल्लेख बंजारा लोकगीतांमध्ये आढळून येतो.संत सेवभाया यांना आपला ईतिहास माहीत होता आनी म्हणून त्यानी जे कार्य हाती घतले ते कार्य म्हणजे आपली समता,स्वातंञ्य,बंधुता वन्यायावर आधारीत गण व्यवस्था टीकुन ठेवने.जी विदेशी ब्राम्हणांच्या वर्ण व्यवस्थेविरूध्द होती.बंजारा समाज आजही आपली वोळख -भाषा (गोर बोली)विशीष्ट पेहराव (स्ञियांचा)सन,वार,लोकगीते,सत्यधर्म इ.च्या माध्यमातून जपून ठेवली आहे.ती ओळख म्हनजेच.संत सेवाभाया यांच्या कार्याचे फलीत होय.गोर बंजारा व्यक्ती भारतच्या कोनत्याही राज्यात गेली तरी थेट गोर बोलीत संवाद साधू शकते.तसेच इतर जातीच्या वस्तीपासून दुर तांडा -नामक स्वातंञ वस्ती करून राहने ही ऐक स्वातंञ वोळख निर्माण करून आपला ऐतिहासीक वारसा जपन्याचा प्रयत्न असावा तसेच इतर समाजाने पुष्यमिञ शुंगाच्याप्रतिक्रान्तीनंतर जेव्हॉ वर्ण व्यवस्थेचे रूपांतर जाती व्यवस्थेत करन्यात आले. त्यानि ब्राम्हनाची गुलामी मान्य केली.व त्याना गावात स्थान मीळाले. बंजारा समाजाने आपली वेशभूशा,व बोलीभाषाच्या माध्यमातून सिंधू सभ्यतेची ओळख जशिच्या तसी टीकून ठेवली व आपले ब्राम्हणीकरन होवू दीले नाही़ अशा प्रकाराचा इतिहास संत सेवालाल महाराजाला माहीत होता.व गोर बंजारा गनाचेकोनत्याही प्रकारे ब्राम्हणीकरन होवू दीले नाही.त्याच्यादीलेल्या शिकनीवरून सिध्द होते.:-संत सेवाभायाचे कार्य व शिकवन :- सेवाभायाचे प्रबोधनाचे माध्यम हे "थाळी-नंगारा"होते त्याच्या माध्यमातून आपले प्रबोधनातून विचार माडत.त्याला गोर बोलीत सीकवाडी म्हनतात.त्याला व त्याचे गोर बोलीत जे वचने प्रसीध्द आहेत त्याला 'भायार बोल' असे म्हनतात . संत सेवाभाया म्हनायचे थाळी नंगारारे घोरेम सदा-सदा रो म्हनजे प्रबोधनाच्या माध्यमातुन सदा जागृती करा़.
(बंजारा सामाजीक कार्यकरर्ता साहेबराव राठोड औराळा (तांडा) )

2 comments:

  1. संत सेवाभाया यांचे चरित्र व उपलब्ध रचना असे पुस्तक कुणी बंजारा बांधव लिहणार असेल तर पंचफुला प्रकाशन औरंगाबाद ते प्रकाशित करेल व सर्व समाजा पर्यंत त्यांचे विचार पोचतील......डॉ. बालाजी जाधव. (9422528290)

    ReplyDelete
  2. Ok thats the great job

    ReplyDelete